अकोला जिल्हा

पातूर येथे वंचित बहुजन आघाडी पातूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना विविध मागणीचे निवेदन

पातूर तालुक्यात दुष्काळी योजना त्वरित लागू करा - भारीप ब.म.सं. ची मागणी

पातूर: आठवडा विशेष टीम― वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय एॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष प्रदीपभाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पातूर येथे वंचित बहुजन आघाडी पातूर तालुक्याच्या वतीने पातूर तालुक्यात दुष्काळी योजना त्वरित लागू करण्यासाठी तालुक्यातील भारीप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर, महिला आघाडी पातूर यांच्या वतीने आज मंगळवार दि. २८ मे २०१९ रोजी तहसीलदार यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
अकोला जिल्ह्यामधील सर्व ९९० गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणुन आधिच घोषित झाला आहे. तसेच पातूर तालुका सुद्धा दुष्काळग्रस्त जाहिर होवुन तब्बल ५ महिने झाले आहे. तरिही अद्यापपर्यंत शासनस्तरावर कुठलिही दुष्काळी उपाययोजना या तालुक्यात दिसत नाही. सदर गावांमध्ये खालील उपाययोजना त्वरित कार्यान्वित कराव्या अन्यथा भारीप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी पातूर तालुका वतीने उपरोक्त मागण्यासाठी तिव्र आंदोलन करण्यात येईल.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या :-

  १ ) शेतकर्यांच्या थकीत कर्ज वसुलीला त्वरित स्थगिती देण्यात यावी.
  २ ) सहकारी कर्जाची पुर्नगठन करण्याचे आदेश.
  ३ ) शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे फी माफीचे आदेश त्वरित संबंधित संस्थांना देण्यात यावे.
  ४ ) रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरु करावी.
  ५ ) शेतकर्यांना कृषि पंपाची विज न तोडण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे.
  ६ ) पाणी टंचाई व जनावरांचे चारा टंचाईचे त्वरित नियोजन करावे.
  अशा विविध मागण्यांचे निवेदन पातूर तहसीलदार यांना भारीप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी पातूर तालुक्याच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी पातूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे पातूर तालुका अध्यक्ष एॅड. विक्रम जाधव, तालुका महासचिव डॉ. ओमप्रकाश धर्माळ, तालुका महासचिव राजुभाऊ बोरकर, तालुका महासचिव राजीकभाई, शहर प्रमुख मो. फहिम मो. उस्मान, शहर महासचिव योगेश इंगळे, शहर प्रसिद्धिप्रमुख प्रविण पोहरे, शरद सुरवाडे, विनोद देशमुख, मनोज गवई, नाना अंभोरे, शैलेश गुळदे, संजीव लोखंडे, पंडित वानखडे, हरिभाऊ इंगोले, मनोहर हिरळकार, मंगेश गोळे, अल्का सरदार, अनीता सिरसाट, सविता टप्पे, पद्मीनी सिरसाट, ऊर्मिलाताई गाडगे, प्रविण इंगळे, नागेश चंद्रभान करवते, राहुल रामभाऊ सदार, अर्जुन राजाराम टप्पे, प्रविण प्रकाश पोहरे, विलास पांडुरंग घुगे, राजेश शहांभर इंगळे, मनोहर पुंडलिकराव हिरळकार, ईश्वर किसन सौंदळे, प्रशांत शंकर उगले, मंगल तेलगोटे, प्रविण भांडारे, सचिन बनिये, मंगेश मुळे, सोपान अंबेकर, हरिभाऊ इंगोले, मनोज महादेव सिरसाट, शुभम इंगळे, गोपाल वासुदेव, मंगेश गोळे, सिद्धार्थ लक्ष्मण इंगळे, रमेश किरतकार, अशोक इंगळे, नितिन भांडारे, रवि पजई, इमरान खान मुमताज खान, गजेंद्र तेलगोटे, प्रविण सिरसाट, रविचंद्र ऊपर्वट, सचिन पोहरे, कपिल गवई आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत. यावेळी पातूर तालुक्यातील व शहरातील भारीप बहुजन महासंघ, महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.