प्राचार्य एम.बी.शेट्टी यांची माहिती
अंबाजोगाई: येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्नीकमध्ये जी.के.एन.एरोस्पेस,पुणे या नामांकित कंपनीच्या वतीने मुलींसाठी कँम्पस मुलाखतींचे आयोजन गुरूवार,दि.30 मे व शुक्रवार,दि.31 मे रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. तरी परिसरातील पॉलिटेक्नीक मध्ये सध्या शिकत असलेल्या व पॉलिटेक्निकचे शिक्षण पुर्ण केलेल्या मुलींनी या कँम्पस मुलाखतीचा लाभ घेवून नामांकित कंपनीत काम करण्याची संधी प्राप्त करावी असे आवाहन टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्नीकचे प्राचार्य एम.बी.शेट्टी व प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डी.एम. कांबळे यांनी दिली आहे.
ज्या विद्यार्थीनींकडे पासपोर्ट आहेत अशा विद्यार्थीनींची जर कँम्पस मुलाखतीमध्ये निवड झाल्यानंतर इच्छुक विद्यार्थीनींना 15 दिवसांच्या प्रशिक्षणाकरीता चीन येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जी.के.एन.एरोस्पेस,पुणे या नामांकित कंपनीने दिली आहे.