अंबाजोगाई : राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री व केंद्रिय अवजड उद्योगमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या 74 व्या जयंती निमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,लोकनेते देशमुख यांच्या काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली.दळण-वळणाची साधणे निर्माण झाली.उद्योग व्यवसाय यांची वाढ झाली.सहकार क्षेत्राला बळ मिळाले,विशेषतः बीड जिल्ह्यासाठी भरिव निधी प्राप्त झाला. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळा मार्फत जिल्ह्याला अनेक प्रकल्प व योजना मंजुर झाल्या.लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी सामान्य माणूस केंद्रबिंदु माणून कार्य केले.त्यांच्या कार्याचे स्मरण कायम राहिल त्यांचे कार्य, विचार यातनू प्रेरणा घेवून पुढील काळात काँग्रेस पक्ष मजबुतीने उभा राहिल,तरूण कार्यकर्त्यांनी लोकनेत्याचा आदर्श घेवून समाजाभिमुख कार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी केले.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार,दि.26 मे रोजी सहकार भवन प्रशांतनगर येथे लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव गांधी पंचायत राज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष रणजित पवार यांनी मानले. यावेळी नगरसेवक अमोल लोमटे,विजय रापतवार,शेख अकबर, यांच्या सहीत एन.एस. यु.आय.,युवक काँग्रेस, सेवादल आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.