बीड जिल्हाराजकारणविशेष बातमी

पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार जि.प.शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण ; ४.८ कोटी रुपये झाला दोन्ही इमारतीवर खर्च

खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्या सांसद आदर्श ग्राम पोहनेरच्या विकासाचे नवे पर्व

परळी दि.१४:आठवडा विशेष टीम― खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी सांसद आदर्श ग्राम म्हणून निवड केलेल्या पोहनेर येथे उद्या विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या १५ तारखेला मोठ्या थाटात होणार आहे.

सकाळी ११.३० वा. पोहनेर येथे होणा-या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री मस्के, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, बांधकाम सभापती युध्दजित पंडित, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, शोभाताई दरेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विकासाचे नवे पर्व

खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी पोहनेर हे गाव आदर्श ग्राम करण्याचा संकल्प केला होता, त्यादृष्टीने विकासाची कोट्यवधी रुपयांची कामे याठिकाणी झाली आहेत. २ कोटी ३० लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा आणि २ कोटी ५० लाख रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत तयार झाली असून त्याचे लोकार्पण उद्या ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button