पाचोर्‍यात फोफावतोय भेसळीचा भस्मासूर नागरिकांचे आरोग्य धोक्यात ;अन्न व औषधे प्रशासन घेतय झोपेचे सोंग

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जीवनावश्यक खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे असंख्य उदाहरणे डोळ्यासमोर घडताना दिसत आहे.मात्र या महत्त्वपूर्ण बाबीकडे अन्न व औषधे प्रशासन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोकादायक आजारांकडे वाटचाल करत आहे. दैनंदिन आहारात दररोज पिकलेली फळे भाजीपाला दुग्ध व व अनेक प्रकारच्या किराणामाल भेसळयुक्त असल्याने सकस आहार व सुदृढ शरीर ही कल्पना मागे सरत आहे. सामान्य ग्राहकांच्या ध्यानात हा प्रकार येत नसल्याने विकणार्‍या व्यापाऱ्यावर भरोसा ठेवून सर्वजण खरेदी कळत असतात मात्र त्या खाद्यपदार्थाच्या माध्यमाने एक प्रकारचे घातक रसायनच त्यांच्या पोटात जात असल्याने अकाली हृदयविकार कॅन्सर,मधुमेह,रक्तदाब,वजन वाढी सारख्या समस्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

फळांवर घातक रसायनांचा वापर

आंबा केळी तसेच पपई या फळांना कमी कालावधीत कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी सोडियम कारवाईचा वापर करणे सर्रास झाले आहे या रसायनांचा वापर करून फळविक्रेते नफा कमावण्याच्या नादात ग्राहकाच्या जीवाशी खेळत आहेत या घातक रसायनांच्या वापराने फळांना लवकर टिकवण्याचा प्रयत्न करताना आकर्षक रंग देखील येत असतो त्यामुळे गिराईक सहजपणे या जाळ्यात फसते. मात्र हे रसायन पोटात गेल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक उदाहरणं निष्पन्न झाले आहेत .

भेसळयुक्त सिंथेटिक दूध :-दूध रोजच्या आहारातील महत्त्वपूर्ण घटक असल्याने शहा व्यतिरिक्त आहारात दुधाचा वापर होत असतो. पालक वर्ग लहान मुलांना पोषक द्रव्य म्हणून दूध पिण्याचा आग्रही प्रयत्न करतात.मात्र ही पोस्ट दूध देखील बेसन व रसायनांच्या जाळ्यात अडकल्याने सर्वसामान्य माणूस संभ्रमित झाला आहे. तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादन परवडत नसल्याने असंख्य शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील दुभती जनावरे कमी केली आहेत तिकडे दूध उत्पादन कमी होत असताना शहरात दुध विक्री व विक्रेते वाढताना दिसत आहे.दूध भेसळ येतील अनेक सुरस कथा एका वयात मिळत असताना शासकीय दुध डेअरी अथवा अन्न व औषध प्रशासन विभाग याबाबत कुठलीही तपासणी किंवा कारवाई करताना दिसत नाही.

भेसळयुक्त तेल व तूप आणि किराणा:

फळे तसेच दुधाबरोबर किराणामालतील भेसळ देखील वाढल्याचे समोर येत आहे.उष्ण वातावरणात सहज विरघळणारे तूप विस्तवावर टाकल्यानंतर विरघळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पॅकिंग मधील खाद्य तेलाच्या शुद्धतेवर संशय व्यक्त केला जात असून सुट्ट्या खाद्यतेलाची शुद्धता तपासावी अशी मागणी होत आहे.घाऊक तसेच किरकोळ बाजारातील बेसन पिठाच्या दरामध्ये प्रचंड तफावत असल्याने यामधील दे शाळेचा संशय सत्य असल्याचे समोर येत आहे .
दैनंदिन आहारातील खाद्यपदार्थांमध्ये रसायनांचा व वापर सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या माध्यमाने फसवणूकी बरोबरच ग्राहकाच्या आयुष्याशी खेळ खेळला जात आहे. यासर्व बाबी गांभीर्याने लक्षात घेऊन प्रशासनाने सत्यता पडताळून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.