पाटोदा:शेख महेशर― पाटोदा तालुक्यासह शहराला सध्याच्या दुष्काळात १९७२ पेक्षाही भयान घेरलेले असुन पाटोदा शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असून यात साईक्रांती बहुउदेशीय सेवाभावी संस्थेने सामान्य जनतेला मदतीचा हात दिला आहे. गेल्या अनेक महिन्या पासून पाटोदा शहर पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जात आहे. वापरण्यासाठी सांड पाणी पाटोदा नगर पंचायत देण्याचा प्रयत्न करीत आहे. पंरतु पिण्याचे शुद्ध पाणी नगर पंचायत कडून मिळत नाही.
पाटोदा शहरातील लक्ष्मीचौक, भामेश्वर गल्ली, तसेच मुस्लीम मोहल्ल्याचा बराचसा भाग येथे दिवसाआड १५०० लिटर पिण्याचे शुद्ध पाणी प्रती घर चार हंडे देण्याचा उपक्रम साईक्रांती बहुउदेशीय सेवाभावी संस्था पाटोदा यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केला आहे.
त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संस्थेचे सचिव श्री.सचिन शिंदे यांनी सांगितले की समाजसेवा करण्यासाठीच सेवाभावी संस्था असतात. सेवा केल्याने समाधान मिळते असे ही ते म्हणाले. तसेच या कार्याची प्रेरणा भामेश्वर मित्र मंडळ, संताजी युवक मंडळ, पत्रकार हमीदखान पठाण, संत वामनभाऊ टेड्रर्स चे मालक सुदर्शन चव्हाण , नगर पंचायतचे सभापती श्रीहरी गिते पाटील , ठक्कसेन गोरे , एल.आय.सी.प्रतिनिधी तथा पत्रकार प्रशांत (काका) देशमुख यांच्या कल्पनेतून व मदतीने साकारलेला हा उपक्रम असल्याचे व शिंदे अशोक (राजु) , संदीप शिंदे , दत्ता मुळे , आनंद जाधव, राजाभाऊ शिंदे (परीट),पठाण सोहेल खान पठाण , यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले आहे. तसेच या पुुढे ही सामाजिक कार्यात साईक्रांती बहुउदेशीय सेवाभावी संस्था सर्वेतोपरी कार्य राहील असे सांगितले.