टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकच्या 25 विद्यार्थ्यांची कँम्पस मुलाखतीद्वारे निवड

पुणे व औरंगाबाद येथील नामांकित कंपनीचे कँम्पस मुलाखत

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकमध्ये ईसीम श्रीनीसन्स सिस्टीम प्रा.लि.,पुणे, धनंजय मेटल क्राफ्टस्,औरंगाबाद व पगारीया ‍अॉटो, औरंगाबाद या 3 नामांकित कंपनींच्या वतीने नुकतेच कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या 25 विद्यार्थ्यांची विविध पदांवर थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अंबाजोगाई येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकमध्ये ईसीम श्रीनीसन्स सिस्टीम प्रा.लि.,पुणे, धनंजय मेटल क्राफ्टस्,औरंगाबाद व पगारीया अॉटो, औरंगाबाद या नामांकित कंपनीच्या वतीने नुकतेच कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे एच.आर.मॅनेजर एस.एस.केदारे, व्ही.एम.काळे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.विद्यार्थ्यांच्या अ‍ॅप्टीट्यूड स्टेट,रिटन टेस्ट व प्रत्यक्ष मुलाखती झाल्या यात संस्थेच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग, ईलेक्ट्रीकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, इंजिनिअरींग या तीन शाखेतील 25 विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाली.
टी.बी.गिरवलकर पॉलिटेनिक मध्ये विद्यार्थ्यांसाठी टेक्नीकल सेशन,व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रोग्राम,कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग, अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात.तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या नविन अभ्यासक्रमानुसार द्वितीय वर्षातील सर्व शाखेतील विद्यार्थी 6 आठवड्याच्या इंडस्ट्रीयल ट्रेनिंगसाठी महाराष्ट्रातील विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.अशी माहिती टी.बी. गिरवलकर पॉलिटेनिकच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाने दिली आहे. कँम्पस मुलाखतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरअप्पा बिडवे , सर्व सन्माननिय सदस्य, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,प्राचार्य एम.बी.शेट्टी, प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डी.एम.कांबळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.