सोयगाव: आमखेडा ग्रामपंचायतीवर प्रशासक द्यावा,चक्क कंटाळलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आमखेडा ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची मागणीच मंगळवारी ग्रामस्थांनी तहसीलदार प्रवीण पांडे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीमुळे खळबळ उडाली असून विकासाच्या कोसो दूर असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सर्वच स्थरातून मनमानी सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केल आहे.
नगर पंचायतीत विलीन न झालेल्या आमखेडा ग्रामपंचायतीत संबंधित ग्रामसेवक मनमानी धोरणातून कामकाज करत आहे.कोणालाही न जुमानता या ग्रामसेवकाची मनमानी सुरु असल्याने सरपंच,उपसरपंच आणि सदस्य यांचेही विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत असल्याने तातडीने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची मागणी चक्क ग्रामस्थांनी केली आहे.टंचाई परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन,रोहयोची कामे, शौचालये, दिवाबत्ती,रस्ते,स्मशानभूमी दुरुस्ती,आदि कामे अद्यापही अपूर्ण असून,विकास म्हणून आमखेडा गावाला माहीतच नाही.जीलः परिषदेचा नुकताच गट म्हणून ओळख असलेल्या आमखेड्याला मुलभूत सोयीपासून दूर ठेवले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर संदीप मिसाल,संदीप इंगळे,एकनाथ गोंड,संतोष घुगरे,दत्तू ढगे,विठल नवगिरे,अशोक फुसे,दत्तात्रय गाडेकर,जमिलाबाई शेख,लक्ष्मीबाई जामोदकर,दिलीप निकम,किशोर फुसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.