औरंगाबाद: सोयगाव तालुक्याचा ८९ टक्के निकाल,संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― उच्च माध्यमिक शाळांत परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून यामध्ये सोयगाव तालुक्याचा ८९ टक्के निकाल घोषित झाला असून यामध्ये सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा ९३.१५ टक्के निकाल घोषित झाला असल्याने संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाने बाजी मारली आहे.तिन्ही शाखांमध्ये महाविद्यालयात ३८० विद्यार्थ्यांपैकी ३५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
सोयगाव तालुक्यातील सोयगाव,गोंदेगाव,बनोटी,सावळदबारा,फर्दापूर,या सहा महाविद्यालात तालुक्यात तब्बल ३०७४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती त्यापैकी २७२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा ८९ टक्के निकाल घोषित झाला आहे,यामध्ये तालुक्यात मुलींचा उत्तीर्ण होण्याचा दर ९२ टक्के असल्याने मुलींनीच बाजी मारली आहे.संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा निकाल ९३.१५ टक्के लागल्याने संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे,सचिव प्रकाश काळे,प्राचार्य डॉ.अशोक नाईकवाडे,उपप्राचार्य डॉ.शिरीष पवार,उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे,अनिल मानकर,गणेश काळे,पंकज साबळे,उदय सोनवणे,प्रा,विजय साळवे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.