पाचोरा (ज्ञानेश्वर धोंडू पाटील): दिनांक 10 रविवार घेण्यात आलेल्या योगासन स्पर्धा अखिल भारतीय विद्याभारती दिल्ली संस्थान अंतर्गत राजर्षी शाहूमहाराज संस्था ,ज्ञान दूत प्रतिष्ठान,इतिहास संशोधन पाचोरा आयोजित योगासन स्पर्धेत पिंपळगाव हरेश्वर येथील सरस्वती शिशुवाटिकेच्या 4 ते 6 आणि 6 ते 8 वयोगटातील विद्यार्थ्यांनी 8 पैकी 6 बक्षीस पटकावले.स्पर्धेत भडगाव येथील केशव सूत प्रतिष्ठान च्या सारस्वती शिशु वाटिका,पाचोरा येथील सरस्वती शिशुवाटिका,पिंपळगाव हरेश्वर येथील सरस्वती शिशुवाटिकेतील 31 विद्यार्थ्यांनी योग स्पर्धेत सहभाग नोंदविला.यात पिंपळगाव येथील छोट्या गटात,ज्ञानल पाटील,ज्ञानश्री पाटील,वैष्णवी हटकर तर मोठया गटात गौरी तेली ,समर पाटील आणि भडगाव येथील रणवीर पाटील,हर्षल भोपे यांनी यश पटकाविले.स्पर्धेची सुरवात प्रमुख पाहुणे सुनील रंगराव पाटील उत्कृष्ठ शेतकरी पत्रक्रार पाचोरा तसेच डॉ पल्लवी पाटील भडगाव, विद्याभरती जळगाव विभाग मंत्री विकास लोहार यांच्या हातून सरस्वती पूजनाने सुरुवात करण्यात आली.प्रमुख पाहुणे सुनील पाटील भारतीय शिक्षण पूर्वापार संस्कृती जोपासणारे आणि आचरणात आणणारे आणि मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारेच ठरले आहे.आणि ते कार्य करतेय विद्याभारती च्या सरस्वती शिशुवाटिका आपले मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले.या कार्यक्रमास परीक्षक म्हणून रवींद्र पाटील ,योगेश जडे,संतोष मोरे,योगेश सोनार,गिरीश बर्वे होते.तर शिक्षक वर्ग शिक्षिका वर्ग सौ शिंदे,भोपे,मोरे ठाकुर,पवार यांनी विद्यार्थ्यांची योगा पूर्व तयारी करून घेतली.
यात पालक सहभाग स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुकतेने उपस्थित होता.
0