क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती व कर्मवीर एकनाथराव आवाड यांची पुण्यतिथी साजरी

अंबाजोगाई: आठवडा विशेष टीम― शहरात क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती तसेच कर्मवीर एकनाथराव आवाड यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

येथील लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात बुधवार,दि.30 मे रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. मिलिंद आवाड तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रिय अध्यक्षा कुसुमताई गोपले तर विचारमंचावर कार्यक्रमाचे आयोजक तथा अखिल भारतीय मातंग संघाचे राज्याचे सरचिटणीस शेषनारायण वाघमारे, मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे,सामाजिक कार्यकर्ते टोपाजी जोगदंड,वसंत उदार, दासराव चव्हाण, तालुकाध्यक्षा पार्वतीताई कास्ते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले आणि कर्मवीर एकनाथराव आवाड यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले.याप्रसंगी बोलताना कुसुमताई गोपले यांनी सांगितले की,मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय मातंग समाजाच्या वतीने गोपले साहेबांनी हे आंदोलन सुरू केले हे आंदोलन आज अभियान बनले आहे. मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात पुढे यावे,समाज संघटित करावा असे आवाहन कुसुमताई गोपले यांनी केले.यावेळी बोलताना प्रा.डॉ.मिलिंद आवाड यांनी मातंग समाज हा संघटित झाला पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजातील युवकांनी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे,समाजात शिक्षण वाढल्याशिवाय प्रगती होणार नाही असे विचार प्रा.डॉ. आवाड यांनी व्यक्त केले.यावेळी अखिल भारतीय मातंग संघ महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी माया सगट यांची निवड करण्यात आली. निवडीचे पञही देण्यात आले.यावेळी उपस्थित महिलांनी कुसुमताई गोपले यांचा तर मान्यवरांनी नवोदित अभिनेत्री रेणुका शहाणे यांचाही सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषनारायण वाघमारे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळणीचे माजी सरपंच हनुमंत गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार वसंत उदार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक शेषनारायण वाघमारे,वसंत उदार, हनुमंत गायकवाड, कमलाकर मिसाळ, अरविंद मिसाळ, पार्वतीताई कास्ते,माया सगट,धिमंत राष्ट्रपाल, अशोक पालके,वाजेद खतीब यांचेसह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.या कार्यक्रमास मातंग समाजातील मान्यवर,महिला,ज्येष्ठ नागरिक व युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.