सोयगाव : लोकमाता पुन्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथील नगर पंचायत कार्यालयात लोकमाता पुन्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती शुक्रवारी (दि.३१)उत्साहात साजरी करण्यात आली.
सोयगाव नगर पंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकमाता पुन्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत पगारे यांच्या हस्ते लोकमाता पुन्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा गटनेते नगरसेवक योगेश मानकर, शेतकरी संघटनेचे कृष्णा जूनघरे, प्रहार संघटनेचे संदीप इंगळे, कार्यालयीन अधीक्षक भगवान शिंदे, अशोक अहिरे, शिवाजी पारधे, राजेश मानकर,राजेंद्र जंजाळ, सारंग महाले,बाबुराव चौधरी, सुरेश महाले, संतोष सोनवणे, संदीप सोनवणे समाधान गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.