औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युज

सोयगाव : पानी टंचाई प्रश्नी आमखेडा ग्राम पंचायतीवर त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा :सरपंचाना घातला घेराव

सोयगाव : येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या आमखेडा येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा ढीसाळ व मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना महिन्यात दोन ते तीन वेळा आरोग्यास हानिकारक दूषित पाणी पुरवठा होत आहे.ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्या साठी रानोमाळ वनवन भटकती करावी लागत आहे. या प्रकरणी वारंवार तक्रार करुण देखील पानी पुरवठा सुरलित होत नसल्याने गावातील त्रस्त पुरुष व महिलांनी सोमवारी (दि.६) ग्रामपंचायतिला नागरिकांनी मोर्चा काढून ग्रामपंचायतला घेराव घातला.

सोयगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून धरनसाठे कोरडे ठाक पडले आहेत.मात्र सोयगाव शहरास व आमखेड़ा गावास सोयगाव (वेताळवाड़ी) तलावातून पाणी पुरवठा यंत्रनेद्वारे पाणी पुरवठा होतो. तलावात मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे.सोयगाव शहराला एक दिवस आड़ नियमीत पाणी पुरवठा होत असतांना आमखेड़ा गावास मात्र महिन्याकाठी केवळ दोन ते तीन वेळा नळाद्वारे पाणी देण्यात येते.
सोमवारी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना घेराव घालीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पुरेसा होत नाही, नळाला कधीही पाणी येते तेही गढूळ व दुर्गंधीयुक्त येते तसेच गावातील समस्या ग्रामसेवक यांना वारंवार सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अश्या प्रश्नांचा भडीमार करीत जाब विचारला.

ग्रामपंचायतच्या नाकर्ते हलगर्जी पनामुळे आमखेडा गावातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. नळाला १० ते १२ दिवसांनी अवेळी पाणी येते त्यातच पाणी ही गढूळ व अस्वच्छ दूषित असते हे पाणी पिण्या योग्य नसते.हे पाणी पिल्याने ताप, मलेरिया, तायफेड सारखे रोग होत असतात.
याप्रकाराकड़े ग्रामसेवक, सरपंच लक्ष देत नाही. नागरिकांच्या आरोग्या सोबत खेळत आहे. बघु उद्या करु, परवा करु असे उडवाउडवीची उत्तरे देत असतात.

पाणी पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी दोन लाखाचे जनरेटर धुळखात

१४ वया वित्त आयोगाच्या निधी तुन दोन लाख रुपये किंमतीचे जनलेटर खरेदी करण्यात आले असून पंरतु एकही दिवस ते चालु केले नाही मात्र दुरुस्तीच्या नावावर विस हजार रुपये दुरुस्ती साठी खर्च करण्यात आले आहे.

गट विकास अधिकारी सोयगाब यांचे आश्वासन

पाण्याची समस्या दोन दिवसात पाण्याची समस्या सोडविण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यामुळे व गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्या मध्यस्थीने नागरिक शांत झाले.

यावेळी दोन दिवसात पाण्याची पाण्याची समस्या सोडवली नाही तर आदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी सरपंच अनिता महाले नाईक व गट विकास अधिकारी ज्योती कावड़देवी यांना दिला.
यावेळी संदीप मिसाळ, निलेश गाडेकर, चंद्रास रोकडे, संदीप इंगळे, कृष्णा पाटील,मुन्ना ढगे, गजानन ढगे, कमलबाई खैरनार, जिजाबाई लोखंडे, नवगिरे, यांच्या सह आमखेडा गावातील महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमखेड़ा ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी विकत घ्यावे लागते एक्वागार्डचे पानी:

आमखेड़ा गावात निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा फायदा काही पाणी विक्रेत्यांनी घेतला असून शुद्धिकरणाच्या नावावर कुढ़लीही प्रयोगशाळा उपलब्ध नसताना क्षारयुक्त ५०० लीटर पाणी २० रुपयांना विक्री करण्याचा सपाटा लावला आहे.या कड़े प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

खासगी टेंकरसाठी मोजावे लागतात ९०० ते १००० रुपये

आमखेड़ा परिसर हा शासकीय कार्यालयांनी वयापलेला आहे. येथे तहसील,वनक्षेत्र, सिटीसर्व्हे,ग्रामीण रुग्णालय,लघु पाट बंधारे शाळा, कॉलेज यांच्यासह सुशिक्षित लोकांची वस्ती आहे.त्यांना नित्य वापरासाठी लागणारे पानी टेंकर द्वारे विकत घ्यावे लागते. एका टेंकरला कमाल ९०० ते १००० रुपये मोजावे लागतात.
सर्वसाधारण ग्रामस्थांना सोयगाव बसस्थानकावरील खासगी बोअर पाणी विक्रेत्यांकडून ५० ते ६० रुपये पाणीड्रम (२०० लीटर) दराने पाणी विकत घ्यावे लागते.
पाण्या आभावी अनेक अधिकारी, कर्मचारी व शिक्षक उन्हाळ्यात चार महीने बाहेर गांवाहून अप डाउन करतात.
या प्रकरणी आमखेड़ा सरपंच अनिता महाले नाईक यांच्याशी संपर्क साधला असता आमखेड़ा गावासाठी नव्याने जल स्वराज्य योजनेचा प्रस्ताव तसेच शासकीय हातपंप घेण्यासाठी प्रस्ताव पाठवले असून किरकोळ पाईप दुरुस्ती करण्यात येत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button