अकोला: शेतमजूर पती-पत्नीची आत्महत्या

अकोला:आठवडा विशेष टीम― अकोट तालुक्यातील महागाव (लहान) या भागातील शेत शिवारात एका विहिरीमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळून आला आहे. ही घटना ३१ मे रोजी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळावर अकोट ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेतली आहे.अकोट तालुका दुष्काळ घोषित झाला आहे. अशा स्थितीत इंधन आणण्याकरीता समाधान वारुळे व बेबीताई वारुळे हे दोघे पती-पत्नी ३० मे रोजी सकाळपासून शेत शिवारात गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही. त्यांचा शोध घेतला असता सकाळी विहिरीमध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. वारूळे पती-पत्नी मुळ कालवाडी येथील रहिवासी आहेत. सासुसासरे थकलेले असल्याने ते महागाव येथेच राहत होते. त्यांना एका मुलगी व मुलगा आहे. त्यांच्यावर घराची जबाबदारी होती. बिकट परिस्थिती व हाताला काम नसल्याने परिस्थिती हलाखीची असल्याचे पोटाची खडगी भरणे कठीण झाल्याचे गावकरी यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी तातडीने पोलिस पथक रवाना झाले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.