सोयगाव: वेताळवाडी धरणात मृतसाठ्यातून चर खोदून शहराला पाणी पुरवठा ;नगर पंचायतीची धडपड

सोयगाव दि.३१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात सोयगाव शहराला पाणीटंचाईची झळ बसत असल्याने वेताळवाडी धरणातील मृतसाठ्यातील पाण्यात चर खोदून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची धडपड नगर पंचायतीने शुक्रवारी हाती घेतली होती.दरम्यान शहरासह चार गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वेताळवाडी धरणात मृतसाठ्यापेक्षाही कमी साठा असल्याने शहरात पाणी पुरवठ्याची चिंता वाढली होती.
सोयगाव शहराची तहान भागविणाऱ्या वेताळवाडी धरणात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्याने,शहराची पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता दिसून आल्यावरून तातडीने नगर पंचायतीला शहराचा पाणी पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना देण्यात येताच नगरपंचायतीने तातडीने उपाय योजनांसाठी मृतसाठ्यातील पाण्यात धरण भागात चर खोदून पाणी पुरवठा विहिरीपर्यत पाणी पोहचण्याची व्यवस्था केल्याने चर खोदून शहराला पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

नगरपंचायतीची पाणी पुरवठा विहीर कोरडीठाक-

दरम्यान शहराची पुरवठा यंत्रणेची पाणी पुरवठा विहीर कोरडीठाक पडल्याने मृतसाठ्यात धरणात चर खोदून पाणी विहिरीपर्यंत पोहचवून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे,परंतु चर खोदून शहराला केवळ आठवडाभर पाणी पुरण्याजोगे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.