प्रा.सौ.शर्मिष्ठाताई शरदराव लोमटे यांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य―सतिषनाना लोमटे

सेवानिवृत्तीबद्दल प्रा.सौ.शर्मिष्ठाताई लोमटे यांचा सन्मान

अंबाजोगाई: शिक्षण क्षेत्रात स्व.भगवानराव लोमटे बापु यांनी केलेले कार्य मोलाचे असून त्यांच्यामुळे ग्रामिण भागात सर्वदुर शिक्षण पोहोंचू शकले वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.या संस्थेच्या उभारणीत सहयोगी प्रा. सौ.शर्मिष्ठाताई शरदराव लोमटे यांचे मोठे योगदान आहे.शैक्षणिक क्षेत्रात शर्मिष्ठाताईंनी केलेले कार्य उल्लेखनिय आहे.सेवानिवृत्त झाल्यातरी यापुढे ही त्यांचे मार्गदर्शन संस्थेला मिळत राहणार आहे. त्यांच्या योगदानामुळे शिक्षण क्षेत्रात संस्थेचा नावलौकिक वाढला असल्याचे सांगुन शर्मिष्ठाताईंनी शैक्षणिक सोबतच सामाजिक, राजकिय क्षेत्रातही योगदान दिल्याचे गौरवोउदगार संस्थेचे अध्यक्ष सतिषनाना लोमटे यांनी काढले.

वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका सौ.शर्मिष्ठा शरदराव लोमटे या 29 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार 31 मे 2019 रोजी सेवानिवृत्त झाल्या.त्यानिमित्त त्यांचा संस्थेच्या वतीने सेवागौरव निरोप समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतिषनाना लोमटे हे होते.तर यावेळी विचारमंचावर वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अखिला गौस यांची उपस्थिती होती.प्रारंभी लोकनेते यशवंतराव चव्हाण, वेणुताई चव्हाण व स्व.भगवानराव लोमटे बापु यांना मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सतिषनाना लोमटे, प्राचार्या डॉ.अखिला गौस यांच्यासहीत संस्थेतील सहकारी प्राध्यापक,प्राध्यापिका यांनी सेवानिवृत्तीबद्दल प्रा.सौ.शर्मिष्ठा शरदराव लोमटे यांचा हृदय सन्मान केला.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ.अखिला गौस यांनी शर्मिष्ठाताई यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा वाटा असल्याचे सांगुन अतिशय कठीण प्रसंगातून संघटीतपणे काम करून हे महाविद्यालय नावारूपास आणल्याचे डॉ.गौस म्हणाल्या.प्रा. शर्मिष्ठाताईंनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासात भरीव योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सेवानिवृत्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना प्रा.शर्मिष्ठाताई लोमटे यांचा कंठ दाटुन आला होता. सेवाकार्यातील विविध प्रसंग त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. 1990 पासुन आपण शैक्षणिक क्षेत्रात कार्य सुरू केले.प्रारंभी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात व त्यानंतर 1991 पासुन वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयात आपण स्व.भगवानराव लोमटे बापुंची प्रेरणा,मार्गदर्शन व आग्रहाखातर रूजू झाल्याचे सांगुन प्रारंभी पासुनच संस्थेचे सर्व प्राध्यापक,कर्मचारी हे अतिशय एकजुटीने, संघटीतपणे काम करीत आहेत.एकमेकांविषयी आदरभाव जपणारे हे शैक्षणिक संकुल आहे. सुरूवातीला विद्यार्थी संख्या वाढविणे,उत्तम शिकविणे,उत्कृष्ट निकालाची परंपरा निर्माण करणे, महाविद्यालयातील विद्यार्थीनींच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविणे,विविध स्पर्धेत सहभाग घेणे हे सर्व संघटीतपणे करून महाविद्यालयास नावारूपास आणले. आज महाविद्यालयात सर्वाधिक मुली शिक्षण घेतात,या संस्थेच्या विद्यार्थीनी आज विविध पदांवर कार्यरत आहेत. सेवेचा संपुर्ण कालावधी पुर्ण होईपर्यंत मला संस्थेतील सर्वांची मदत झाली.सर्वांनी समजून घेतले.प्रा.घरजाळे सर,प्रा.सरोदे मॅडम, प्रा.ठाकरे मॅडम,देशपांडे सर या सर्वांनी आपणास सहकारी म्हणुन वेळोवेळी सहकार्य केले.माझ्या बरोबरच्या सहकारी प्रा.डॉ.अखिला गौस या महाविद्यालयाच्या प्राचार्या झाल्या हे पहावयास मिळाले ही माझ्या दृष्टीने अनंदाची बाब असल्याचे सांगुन अनावधानाने माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर त्यांनी मोठ्या मनाने माफ करावे असे आवाहन प्रा.शर्मिष्ठाताई लोमटे यांनी यावेळी केले.तर यावेळी प्रा.राजकुमार चाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार डॉ.मेघराज पौळे यांनी मानले.यावेळी पंकज शरदराव लोमटे व कुटूंबिय, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आदींसहित विद्यार्थीनी, पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.