सोयगाव: गलवाडा (एस) येथील विवाहिता आकस्मित मृत्यू ; खून झाल्याची पित्याची तक्रार

सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी माहेरच्या मंडळींचा सोयगाव पोलीस स्टेशनला सहा तास ठिय्या

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथून जवळच असलेल्या गलवाडा येथे एका विवाहितेस मानसिक , शाररीक छळ करून जीवानिशी मारून टाकल्यायाची तक्रार विवाहितेच्या पित्याने सोयगाव पोलीस ठाण्यात दिली असून गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते.याप्रकरणी अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. सुरेखाबाई संतोष सोनवने रा गलवाडा हिचे लग्न होऊन अडीच वर्ष झालेले आहे.लग्न झाल्यापासून माझ्या तिचा पती , सासू , सासरा ,दीर व जेठाचा फार त्रास असून तिचा ट्रक्ट्रर घेण्यासाठी पैसे आणण्यासाठी मानसिक व शाररीक छळ सुरू होता.दि ३१ मे रोजी पतीने बेदम मारहाण करीत जीवानिशी मारून टाकळ्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे.संतोष शेणफडू सोनवणे यांच्यासह सासरच्या मंडळी विरुध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयत विवाहितेचे वडील , आजी व नातेवाईक यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दिलीप मचे , महिला आघाडी प्रमुख लताबाई चौधरी , शाखा प्रमुख बापू चौधरी, गजानन जाधव यांनी पोलीस निरीक्षक माधव गुंडीले यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. दरम्यान याप्रकरणी अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून तपास करून दोषी आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक माधव गुंडीले यांनी दिली.

पत्रकारांशी अरेरावी गुन्हा दाखल करण्याची धमकी:

मयत विवाहिते च्या मृत्यू प्रकरणी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसलेल्या नातेवाईकांशी संवाद साधून आंदोलनाचा फोटो घेणाऱ्या पत्रकार भरत पगारे यांच्याशी पोलीस उपनिरीक्षक एस एस रोडगे यांनी अरेरावीची भाषांमध्ये बोलत होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.