कर्मवीर अ‍ॅड.एकनाथरावजी आवाड (जिजा) राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने अविनाश बर्वे सन्मानित

अंबाजोगाई :आठवडा विशेष टीम― शोषित,पिडीत व उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी शासन व प्रशासन,प्रस्थापितांच्या विरोधात बंड करून सर्व सामान्य व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य झिजवणारे कर्मवीर अ‍ॅड. एकनाथरावजी आवाड (जिजा) यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्रात उपेक्षित माणसांच्या न्याय हक्कासाठी काम करणार्या कार्यकर्त्याला प्रेरणा मिळावी.यासाठी युवा प्रतिष्ठाण अंबाजोगाईच्या वतीने समाजात प्रबोधन करणारे,धम्म चळवळ गतीमान करून योगदान देणारांना हा पुरस्कार दिला जातो.पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षी कर्मवीर अ‍ॅड. एकनाथराव आवाड राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अविनाश बर्वे यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतराव पारवे (भाऊ), तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.मिलींद आवाड यांच्यासहीत राहुल शिंदे (जि.उ.लालसेना),सुनिताताई नरंगलकर (सामाजिक कार्यकर्त्या), प्रशांत दहिफळे (अध्यक्ष,दत्त सेवाभावी संस्था) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी अविनाश बर्वे यांना कर्मवीर अ‍ॅड. एकनाथराव आवाड राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र, शाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ व कर्मवीर एकनाथराव आवाड स्मृती ग्रंथ असे होते. परळी वै.येथे रविवार, दि.2 जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रा.डॉ.मिलींद आवाड यांनी सदरील उपक्रमाचे कौतुक करून कर्मवीर एकनाथरावजी आवाड यांनी संपुर्ण आयुष्य वंचित घटकांसाठी कार्य केल्याचे सांगुन त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीने जोपासावा असे आवाहन केले.तर सत्काराला उत्तर देताना अविनाश बर्वे यांनी या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढल्याचे सांगुन उर्वरीत आयुष्य समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी करणार असल्याचे सांगुन त्यांनी जिजांच्या आठवणी जागवल्या. यावेळी राहूल शिंदे, प्रशांत दहीफळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप संतरामभाऊ पारवे यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पालके यांनी करून उपस्थितांचे आभार हनुमंत गायकवाड यांनी मानले.प्रारंभी सुत्रसंचालन करताना व कार्यक्रमाच्या शेवटी सत्यभामा सौंदरमल यांनी चळवळीची प्रबोधनात्मक गीते सादर केले.यावेळी भागवत वाघमारे, डॉ.माणिक कांबळे, संपादक अभिमान मस्के,राजू घोडे, राधाबाई सुरवसे,अनिता वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व आयोजक अशोक पालके,लालासाहेब लोंढे,सचिन दोनगहू, सुधाकर जोगदंड, अमोल जोगदंड,अमोल गायकवाड,अनिल वाघमारे,नारायण डावरे, दिलीप पालखे,राम जोगदंड,सत्यभामा सौंदरमल,रेखा सरवदे, सुवर्णा मिसाळ,धिमंत राष्ट्रपाल,परमेश्वर आडागळे,दत्ता उपाडे, बंडु ताटे,मारूती मस्के, जालिंदर कसाब,दशरथ कांबळे,हणुमंत गायकवाड,राम जोगदंड,दिलीप पालके, भारत क्षीरसागर,गणेश लांडगे,अरविंद मिसाळ, वसंत उदार,लक्ष्मण साळवे,किरण सगट, नारायण डावरे आदींनी पुढाकार घेतला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.