शिक्षण संस्थेअंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्गंत व्हावी : डोनेशन घेणार्‍या शाळांवर बंदी घाला

अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय आयुक्तांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळेतून प्रवेशासाठी बर्‍याच शाळेतून पैशाची मागणी केली जाते व पैसे आकारणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात नाही व त्या पैशाची पावती ही दिली जात नाही यामुळे पालकांची कुचंबना होत आहे शिवाय कामात दिरंगाई पण केली जाते.त्यामुळे खाजगी शिक्षण संस्थेची प्रवेश प्रक्रिया ही गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली पुर्ण करण्यात येवून डोनेशन घेणार्‍या खाजगी शाळांवर बंदी घालण्यात यावी.अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना सोमवार,दि.3 जून रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये नोटीस बोर्डावर येथे डोनेशन घेतले जात नाही अशी नोटीस लिहिण्यात यावी ही,वास्तविक प्राथमिक शिक्षण कायदा 2009 नुसार कुठल्याही शाळेला कुठलीही फिस आकारता येत नाही. तरी फी वसुल करण्याची पद्धत सर्व शाळेमधुन बंद करावी व आशा शाळांची चौकशी गटशिक्षणाधिकार्यांनी करण्यासाठी समिती निवडावी व पालकांना योग्य तो न्याय द्यावा ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आपणास नम्र विनंती करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रताप (राणा) चव्हाण,काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दिनेश घोडके, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास काळुंके,राम भोसले, शेख खलील,प्रमोद खरात,धनंजय सुरवसे,अजय रापतवार आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.सदरील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बीड, उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई, गटशिक्षणाधिकारी अंबाजोगाई व तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक अनुदानीत शाळांना देण्यात आले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.