सोयगाव: खरीप हंगाम पूर्वतयारीच्या सोयगाव तालुक्यात कृषी विभागाच्या बैठका,शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सोयगाव,ता.४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत असताना कृषी विभागाच्या विविध खरीप हंगाम योजनाचा लाभ घ्यावा तसेच पावसाची चार इंच ओल झाल्याशिवाय पेरण्या करू नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुदाम घुले यांनी मंगळवारी आयोजित गावनिहाय बैठकांमध्ये शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
तालुका कृषी विभागाकडून मंगळवारी पासून तालुकाभर खरीप हंगाम पूर्व तयारी या विषयावर बैठका आयोजित करण्यात येत आहे .. त्यात गावोगावी कृषी सहायक,कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषि विभागाच्या योजना व पीक विषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या मोहिमच्या अनुषंगाने मौजे वडगाव,बनोटी,वरठाण,गोंदेगाव या गावात बैठका घेण्यात आल्या बनोटी येथील शेतकरी प्रशिक्षण बैठकीत मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी सुदाम घुले यांनी खरीप हंगामची तयारी करीत असताना खते,बियाणे,रासायनिक खते व इतर निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी तसेच म ग्रा रो ह यो, फळबाग, ठिबक, यांत्रिकीकरण, शेततळे, शेडनेट शेती,या सारख्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास संजय पाटील सोयगावकर वरिष्ठ शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी कापूस पीक लागवड तंत्रज्ञान व मका पिकावरील लष्करी चे नियंत्रण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी एस.जी वाघ,अरविंद टाकणंकर,कृषि अधिकारी समाधान चौधरी,कृषी सहाय्यक वनसिंग खर्डे,बेबिचंद चौरे,संभाजी पाटील,अमोल गुरसुडे,माधवराव चौधरी,विजय पाटिल,धरमसिंग सोळुंके आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.