बीड:- ( दि.२३ ) बीड शहरात शासनाच्या नगरोत्थान सुवर्ण जयंती टप्पा क्रमांक १ मधुन ७० कोटी रूपयांची आणि टप्पा क्रमांक २ मध्ये ६९ कोटी रुपयांची अशी एकूण जवळपास १४० कोटी रुपयांची ६० फुट रूंदीचे सिमेंट रस्ते व नाल्यांची कामे करण्यात आली.मात्र
रस्त्यांच्या मध्यभागी महावितरणचे विद्युत पोल व विद्युत रोहित्रांमुळे ईतरत्र हलविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही. नगरपालिका आणि महावितरण एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी टाळत आहेत. रस्त्यांच्या मध्यभागी असणाऱ्या महावितरणचे पोल व विद्युत रोहित्रांमुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीस अडथळा व अपघाताचा धोका निर्माण झाला असुन विद्युत पोल व रोहित्र ईतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२३ सोमवार रोजी नगरनाका ते कृषी कॉलनी दरम्यान तुळजाई चौक याठिकाणी नगरपालिका व महावितरणच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. निवेदन जिल्हाधिकारी बीड , मुख्याधिकारी नगरपालिका बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री यांना देण्यात आले यावेळी शेख युनुस,सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, हरिओम क्षीरसागर,शिवशक्ती भिमशक्ती विचारमंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे आणि नागरीक उत्तमराव मिसाळ,मुकुंद भुतपल्ले, वालचंद चाटे,मोहन खरमाटे, गणेश वाघ, महावीर बोरा, विनायक घोळवे,रामराजे राक्षसभुवनकर,
महेश मेहेत्रे, डॉ.मोरे,
ज्ञानेश्वर राऊत, ओंकार जोशी, नामदेव वाघ, प्रविण कुलकर्णी,सारंग जोशी,विजय काटे, इंजिनिअर घोळवे, श्रीरंग शिंदे, रविंद्र पौळ आदी सहभागी होते.
बीड शहरात गेल्या २ वर्षांपासून नगरोत्थान सुवर्ण जयंती टप्पा क्रमांक १ मधुन ७० कोटी आणि टप्पा क्रमांक २ मधुन ६९ कोटी रुपयांची एकुण जवळपास १४० कोटी रूपयांची ६० फुट रूंदीचे सिमेंट रस्त्यांची व नालींची कामे करण्यात आली. रस्ते व नाली बांधकामास निधी मिळाला मात्र रस्त्यावरील पोल व वीज रोहित्र ईतरत्र हलविण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने स्थलांतरित करण्यात आले नाहीत.परंतु रस्त्याच्या मध्ये वाहतुकीस अडथळा व अपघाताला निमंत्रण ठरणा-या रोहित्र आणि विद्युत खांब काढण्याची तसदी संबंधित विभागाने घेतली नाही. बीड शहरातील नगरनाका ते कृषी कॉलनी दरम्यान असणाऱ्या रस्त्यावरच तुळजाई चौकाच्या पुढे जागोजागी महावितरण चे विद्युत पोल असून ते एका सरळ रेषेत नाहीत. त्यातच एसबीआय बँकेच्या जवळ असणाऱ्या विद्युत रोहित्रांनी रस्त्याच्या मधोमध स्थान मांडलेले असून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. नगर नाका ते कृषी कॉलनी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर नाट्यगृह ,अनेक दवाखाने, वाचनालय ,शाळा यांच्यासह अनेक खाजगी शिकवण्या आहेत. एसबीआय बँकेची शाखा याच मार्गावर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ या रस्त्यावर असते. मध्यंतरी या रस्त्याचे काम करून हा रस्ता सिमेंटचा बनविण्यात आला. परंतु रस्त्याच्या मधोमध धोकादायक स्थितीमध्ये असणारे विद्युत रोहित व खांब असल्याने ते देखील कललेल्या स्थितीत आहेत. त्याच्या चोहींकडुन लटकणाऱ्या विद्युत तारांमुळे नागरिकांची मोठे गैरसोय होत असून त्या ठिकाणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे .रस्त्याच्या मध्येच विजेचे रोहित्र असल्यामुळे अनेक वेळा वाहनधारकांना समोरून येणारे वाहन ब-याच वेळा लक्षात येत नाही .त्यामुळे अपघात देखील झालेले आहेत .त्यामुळे हे विजेचे खांब आणि रोहित रस्त्याच्या एका बाजूला घेऊन लटकणाऱ्या तारा सुव्यवस्थेत करून नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीतून मुक्त करण्यात यावे.अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.
बीड शहरातील ईतरत्र रस्त्यांच्या मधोमध असणारी रोहित्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावीत
बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, राजीव गांधी चौक, बार्शी नाका ,केएसके महाविद्यालय,आदी ठिकाणी सुद्धा रस्त्याच्या मधोमध विद्युत रोहित्र,विद्युत खांब,फोनची डीपी आदी वाहतुकीस अडथळा व अपघाताला निमंत्रण देणारी असुन नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत आवश्यक उपाययोजना करत नाही त्यामुळे रोहित्र सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावेत
उघड्या रोहित्रांमुळे दुर्घटनेची भीती ; महावितरणने उपाययोजना करावी
बीड शहरात रस्त्यांच्या कडेला जमिनी लगत उघडे विद्युत रोहित्र आणि उघडे विद्युत खांब आहेत.ते अपघातास कारण ठरू शकतात. शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड,तुळजाई चौक , राजीव गांधी चौक, बार्शी नाका ,केएसके महाविद्यालय,बालेपीर,माने कॉम्प्लेक्स रोड, सुभाष रोड, जालना रोड, जुने एसपी कार्यालय,कंकालेश्वर मंदिर,साठे चौक आदी ठिकाणी उघडे आणि जमिनीलगत रोहित्रांची वीज उपकरणे , फ्युज बॉक्स , पुर्णपणे उघडे व मोडकळीस आलेले आहेत.रोहित्र जमिनीलगत असल्याने याचा मोठा धोका निर्माण झाला असुन ते जमिनीपासून किमान १० फुट उंच असणे आवश्यक आहे. नगरपालिकेने सिमेंट रस्ते केल्याने शहरातील मुख्य रस्त्यासह चौकाचौकात २२ ठिकाणी उघडे जमिनी लगत रोहित्र असल्याने याचा नागरीकांसह जनावरांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.महावितरणचे याकडे दुर्लक्ष असुन भविष्यात दुर्घटना घडण्यापुर्वीच तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात यावी.