ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा घ्या-डॉ. हुलगेश चलवादी

‘बसप’चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन


दिनांक २४ डिसेंबर २०२४, पुणे
: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बहुजन समाज पार्टीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करीत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा अवमान गृहमंत्र्यांनी केला असून, त्यांच्या वक्तव्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी भावना बसप प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी मंगळवारी (ता.२४) केला.

निवेदन सादर करतांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुदीप गायकवाड,पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप कुसळे,राजेंद्र गायकवाड, ऍड. सोनावणे, मो.शफी, बापूसाहेब कुदळे, महेश जगताप, अनिल त्रिपाठी, रमेश गायकवाड, पीआर गायकवाड, शीतल गायकवाड, अरुणअन्ना गायकवाड, डावरे, वानखेडे, प्रदीप ओहळयांच्या सह जिल्ह्यातील सर्व विधानसभा उमेदवार व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बहुजन समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे महानायक आहेत.त्यांच्यावरील असे अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही, असे डॉ.चलवादी म्हणाले.बहुजन समाजाने समंजस्याची भूमिका घेतल्याने महाराष्ट्र पेटला नाही, हॆ विशेष. परंतु, समाजाच्या रोष केवळ शहा यांच्या राजीनाम्यानंतरच शांत होईल,असे डॉ.चलवादी म्हणाले.

देशातील दलित,वंचित ,शोषित, उपेक्षितांसह इतर मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी ग्रंथाची निर्मिती करणारे डॉ.बाबासाहेबांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आक्षेपार्ह व्यक्तव्य देशवासियांच्या भावनांना दुखावणारे आहे.
अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करण्याची मागणी बसपची असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर देशभरात बहुजन समाजाने तीव्र निषेध व्यक्त करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.शहांनी केलेल्या वक्तव्यासाठी देशवासियांची क्षमा मागावी तसेच शब्द परत घेत पश्चाताप करावा, अशी मागणी बसपाची आहे.

आंबेडकरी समाजाच्या मतांसाठी राजकारण करणारे कॉंग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बाबासाहेबांच्या आत्म-सन्मानार्थ प्रयत्नांवर बाधा टाकण्याकरीता सर्वच पक्षाचे नेते बसपावर घाव घालणाऱ्या षंडयंत्रामध्ये सहभागी असल्याचा दावा डॉ.चलवादी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button