महावितरण परळी कार्यालयाकडुन साहित्य देण्यास टाळाटाळ

आवश्यक त्याठिकाणी साहित्याचा पुरवठा करावा―वसंत मुंडे

परळी वैजनाथ: महावितरणच्या परळी कार्यालयाकडे आतापर्यंन्त ट्रान्सफार्मर व वीज लाईनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध नव्हते परंतु हे साहित्य उपलब्ध होऊ नही अधिकार्‍यांकडुन ते ग्राहकांना देण्यासाठी टाळाटळ होत असल्याने भर उन्हाळ्यात वीजेचा लपंडाव सुरु आहे. याबाबत श्रम व रोजगार विभागाचे चेअरमन वसंत मुंडे यांनी पाठपुराव केला होता. तरी देखील हे साहित्य धुळखात पडले आहे. याचा उपयोग मात्र महावितरणने अद्याप केलेला नाही. हे साहित्य तात्काळ आवश्यकत्याठिकाणी वाटप करावे असे मागणी वसंत मुंडे यांनी केली आहे.
महावितरणच्या परळी कार्यालयाकडुन मागील कित्येक महिन्यापासुन ट्रान्सफार्मरच्या व वीज लाईनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे फियुज, फियुज तार, हॅन्ड ग्लोज, रोहित्र झाकण असे साहित्य नव्हेत याबाबत श्रम व रोजगार विभागाचे चेअरमन वसंत मुंडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर हे साहित्य उपलब्ध झाले आहे. परंतु या सहित्याचा ग्राहकांना कुठलाच उपयोग होत नाही. वरिष्ठ कार्यालयांकडुन आलेले साहित्य परळीच्या महावितरण कार्यालयात धुळखात पडुन आहे. ऐवढेच नव्हे तर पावसाळ्या पुर्वी करण्यात येणार्‍या दुुरुस्तीसाठीही हे साहित्य वापरले गेले नाही. यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले असुन पावसाळ्याच्या दिवसातर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असतांना परळी महावितरणचे अधिकारी मात्र कुलर लावून थंड हवेचा अनुभव घेत आहेत. शेतकरी दुष्काळात होरपळत असतांनासुध्दा महावितरणकडून वसुली चालु आहे व विद्यतु पुरवठा खंडित होत आहे. मात्र परळी उपविभाग महावितरण कार्यालयातील अधिकार्‍यांची नेहमीच वीज ग्राहकांस आठमूठी भुमिका घेत आहे. मागील पाच महिन्यांंपासून परळीतील ग्राहकांनी माहवितरणला वसुलीसाठी सहकार्य करुनसुध्दा ग्राहकांना सेवा देण्यास मात्र महावितरणकडून हलगर्जीपणा होत असून परळी तालुक्यातील वीज पुरववठा सारखाच खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांस सेवा दर्जेदार सेवा देण्यात येत नाही मात्र वसुली ग्राहकांच्या व शेतकर्‍यांच्या मुळावर येवून ठेपली आहे. परळी महावितरण कार्यालयात किटकॅट, फ्यूज तार, कर्मचार्र्‍यांसाठी लागणारे सुरक्षा साधणे, लग्ज्स, डिओ तार ई.साहितयाचा तुटवडा मागल अनेक महिन्यांपासून जाणवत होत हे साहित्य येऊन देखील अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे ते साहित्य आवश्यकत्याठिकाणी अद्याप पर्यंन्त पोहांचविण्यात आले नाही. या अधिकार्‍यांच्या आशा भोंगळ कारभाराबद्दल वीज ग्राहकांतुन संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.