आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनोखा उपक्रम राबवला.
औरंगाबाद- मसीहा फाउंडेशनचे अध्यक्ष शेख असिफ याने आपल्या आई-वडिलांच्या लगनाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी सातारा परिसर येथील भगवान बाबा बालिकाश्रम बालगृहात अन्नदान वाटपाचा निर्णय घेतला होता.
रविवारी सकाळी दहा वाजता फाउंडेशनचे शेख आसिफ यांनी भगवान बाबा बालिकाश्रम बालगृहात आपले वडिल शेख लतिफ अब्दुल रहेमान यांचा सह अनाथ मुलांना जेवण खाऊ घालून आपल्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवस अनोखा अंदाज मध्य साजरा केला.
यावेळी 120 अनाथ मुलींना अन्नदान (खाऊ देवून) शेख असिफ यांनी आनंद व्यक्त केला आहे.
शेख असिफ यांनी सांगितलं की, प्रत्येक जणांनी आपला वाढदिवस असो किंवा छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असो अनाथ मुलांसोबत जेवण खाऊ घालून किंवा त्यांच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने उत्साहाने कार्यक्रम साजरा करावे असे शेख असिफ यांनी सांगितलं आहे.मासीहा फाउंडेशन ची स्थापना तीन वर्षांपूर्वी केलेली असून दर रविवारी घाटी दवाखान्या येथे रुग्णांना तसेच त्यांचे नातेवाईकांना अन्नदान भोजन या माध्यमातून आम्ही सेवा करीत आहेत. तसेच माझे वडील शेख लतीफ अब्दुल रहेमान यांच्या 33 वा लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण सातारा परिसर येथील भगवान बाबा बालिका आश्रम बालगृह आम्ही अनाथ मुलांसोबत जेवण खाऊ घालून लग्नाच्या वाढदिवस साजरा केलेला आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शेख आसिफ,उपाध्यक्ष युनूस रामपुरे, तराणसिंग, सुखविंदर सिंग, विनोद इंगोले, शेख असिफ यांचे वडील शेख लतीफ, भगवान बाबा मालिकाश्रम चे सेविका शोभा गांधी आदी उपस्थित होते.
बालिकाश्रम चे सेविका शोभा गांधी यांनी सांगितलं की कन्नड आणि औरंगाबाद येथे या बालिकाश्रमामध्ये जवळपास 300 अनाथ मुला मुली आहेत तसेच या बालिकाश्रमामध्ये अनेक दानशूर यांचे योगदान असून तसेच या भगवान बाबा बाल आश्रमात आतापर्यंत 22 अनाथ मुलींचे संस्थेचे अध्यक्ष यांनी लग्न करून दिलेले आहेत. तसेच चार मुलींचे सध्या साखर पुडा (एंगेजमेंट) झालेली असून लवकरच त्यांच्या लग्न होणार आहे. आमच्या या संस्थेला अनेक लोकांचे योगदान आहे. यापुढेही अनेक मान्यवरांनी या संस्थेला मदत राहील तसेच मासीहा फाउंडेशन तर्फे में अन्नदान च्या कार्यक्रम घेतलेला असून ही अतिशय आनंद होत आहेत. अनाथ मुलांसोबत जेवण करताना जेवण खाऊ घालताना अनेक मान्यवर भावभूक होऊन जातात.
अनेक दांशूरांचे आम्ही धन्यवाद करतो असे यावेळी सेविका शोभा गांधी यांनी सांगितलेल्या आहेत.