औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात ईद उत्साहात

सोयगाव दि.५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात ईदचा उत्साह शांततेत साजरा करण्यात आला,यावेळी मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज पठन करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

बुधवारी शहरासह तालुक्यात ईदचा उत्साह शांततेत साजरा करण्यात आला होता. सोयगाव ,फर्दापूर,सावळदबारा,जरंडी,बनोटी,गोंदेगाव,वाकडी,तिडका,घोसला,आदि परिसरात ईदचा उत्साह साजरा करण्यात येवून यंदाच्या दुष्काळातून मुक्ती मिळण्यासाठी इदगाह दर्ग्यावर नमाज पठन करण्यात येऊन शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येऊ दे अशी मागणी करण्यात आली होती.शहरातील इदगाह मैदानावर पोलीस आणि महसूल प्रशासानाकडून पोलीस निरीक्षक माधव गुंडीले आणि नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांनी मुस्लीम बांधवांचे स्वागत केले.यावेळी तालुकाभर ईद निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.