सोयगाव: टँकर मंजुरीसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने सोयगाव तालुक्यात टँकर मंजुरी बंद,पाण्यासाठी गावागावात जत्रा

सोयगाव दि.५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यात नवीन टँकर मंजुरीसाठी पाण्याचा स्रोतच नसल्याने,टँकर मंजुरी ठप्प झाल्याने दोन महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई असलेल्या सोयगाव तालुक्यात केवळ आठ गावात बारा टँकरवर पाणी टंचाई भागाविल्या जात आहे.
सोयगाव तालुक्यात पूर्णच्या पूर्ण गावे पाणी टंचाईचं विळख्यात अडकली असतांना टँकर मंजुरी असलेल्या गावांनाही पाण्याचे टंचाई भासत आहे.वाढती लोकसंख्या असलेल्या आठ गावांना केवळ बारा टँकर सुरु असून यामध्ये बारां हजरा लिटरचे क्षमता असलेल्या एक फेरी होत आहे.त्यामुळे गावांना ही टँकर अपूर्ण पडत असल्याने नवीन टँकर मंजुरीसाठी तालुक्यात पाण्याचा स्रोतच उपलब्ध नसल्याचे चक्क पत्रच तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला दिले आहे.दरम्यान सोयगाव तालुक्यात टँकर मंजुरी असतांनाही पाणी कमी पडत असल्याने गावागावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर गर्दी पडत असल्याने टँकर मंजुरी असलेल्या गावांना वाढीव टँकर आणि नवीन गावांना टँकर मंजुरीची प्रतीक्षा पाण्याआभावी लागून आहे,त्यामुळे तुटपुंजे पाणी असलेल्या विहिरींना अधिग्रहण करून पाणी टंचाई वर बोळवण घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे.

तब्बल ८१ गावे पाणी टंचाईने होरपळली-

सोयगाव तालुक्यात आठ गावांना टँकर सुरु असून या गावांना वाढीव टँकर साठी मंजुरी मिळत नसून उर्वरित ८१ गावांना तर टँकर तर दुरच परंतु विहीर अधिग्रहणची देखील प्रक्रिया सुरु झालेली नसून विहीर अधिग्रहणची प्रस्ताव धूळखात पडून आहे,विहीर अधिग्रहांसाठी विहिरंना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याचे तालुका प्रशासनाचे म्हणणे आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.