दहावीचा निकाल आज? maharesult.nic.in वर पाहा SSCचा निकाल

आठवडा विशेष टीम― बारावी,सीईटी,नीट च्या निकालानंतर आता दहावीचे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच SSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल maharesult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून जाहीर होईल. काही वृत्तसंस्था आज 10वीचा निकाल जाहीर होणार असल्याचे वृत्त देत आहेत.

दरम्यान, 10 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 7 किंवा 8 जूनला लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण बोर्डाच्या वतीने अद्याप निकालाचा अधिकृत दिनांक जाहीर करण्यात आलेला नाही. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 10वी चा निकाल लागण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता 6 ते 8 जून दरम्यान निकाल लागू शकतो, असे म्हटले जात आहे. 12वी पर निकाल 28 मे रोजी दुपारी बोर्डाच्या संकेतस्थळावर लागला होता. त्याप्रमाणे 10वी चा निकालसुद्धा दुपारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *