आंबेजोगाई: नीट परिक्षेत न्यु होरायझन अ‍ॅकॅडमीचे घवघवीत यश;4 विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र

अंबाजोगाई: दोन वर्षांपुर्वी अंबाजोगाईत सुरु झालेल्या न्यु होरायझन अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन करुन वैद्यकिय आणि दंतवैद्यकिय प्रवेशांसाठी ते पात्र ठरले आहेत. नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यास यातून न्यू होरायझन अ‍ॅकॅडमीने यशाचे तंत्र व मंत्र विकसित करुन अ‍ॅकॅडमीचे 4 विद्यार्थी या वर्षी वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी पात्र ठरल्याने बालाजी शिक्षण प्रसारक मंंडळाच्या न्यु होरायझन अ‍ॅकॅडमीने पालकांचा व विद्यार्थ्यांचा विश्‍वास संपादन करुन अंबाजोगाईला पुन्हा शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करीत गुणवत्तेची परंपरा जोपासली आहे.पुढील काळात अंबाजोगाई शहरातुन वैद्यकिय व अभियांत्रिकी क्षेत्रासाठी अभ्यासु व्यक्तीमत्त्वाची जडण-घडण करुन नीट व स्पर्धा परिक्षेत अंबाजोगाई पॅटर्न निर्माण केला आहे.

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु होरायझन व न्यु व्हिजन अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून अंबाजोगाई व परिसरातील अनेक गुणवंत विद्यार्थी हे भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर व प्रशासकीय सेवेत मोठ्या पदांवर कार्यरत व्हावेत या विधायक भुमिकेतून दोन वर्षांपूर्वी न्यु होरायझन व न्यु व्हिजन अ‍ॅकॅडमी सुरु करण्यात आली.दोन वर्षांत या अ‍ॅकॅडमीचे दुर्गा बुरांडे (503), आदर्श निसर्गंध (448), अमिशा सोनवणे (462),रोहित निसर्गंध (377) प्राप्त केले आहेत.एकूण 720 गुणांपैकी सदरचे गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्याने ते वैद्यकिय व दंतवैद्यकिय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.या गुणवंत विद्यार्थ्यांचा अ‍ॅकॅडमीच्या सभागृहात बुधवार,दि.5 जून रोजी संस्थेचे मार्गदर्शक राजकिशोर मोदी व मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत ह्रद्य सत्कार करण्यात आला. सत्काराचे स्वरुप शाल, फेटा,पुष्पगुच्छ असे होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक राजकिशोर मोदी तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,डॉ.डि.एच.थोरात, प्रा.वसंतराव चव्हाण, प्रा.डी.किरण,भुषण मोदी,प्रा.शिवकुमार, संकेत मोदी,माजी नगरसेवक सज्जन गाठाळ,सामाजिक कार्यकर्ते सुनिल व्यवहारे,मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड,श्री. पटेल या मान्यवरांची तसेच यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना डॉ.डि.एच. थोरात यांनी न्यु व्हिजन व न्यु होरायझन अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे टिमवर्क असल्याचे सांगुन दोन वर्षांत 4 विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरल्याचा मोठा आनंद असल्याचे सांगुन याचे श्रेय राजकिशोर मोदी यांचे असल्याचे डॉ.थोरात म्हणाले.तर प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी यांनी या वर्षीपासुन नवे शैक्षणिक धोरण येत आहे त्यांचा फायदा वैद्यकिय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना होणार आहे.अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागात हे मोठे यश मिळाले आहे.असा वैद्यकिय व अभियांत्रिकी प्रवेशासाठीची तयारी न्यु होरायझनच्या माध्यमातून अंबाजोगाईतून विद्यार्थ्यांना करता येईल असे डॉ.खडकभावी म्हणाले तर अध्यक्षीय समारोप करताना राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,शाहू, नांदेड पॅटर्नच्या धर्तीवर गुणवत्तेचा ‘अंबाजोगाई पॅटर्न’ निर्माण व्हावा, अभियांञिकी व वैद्यकिय प्रवेशाच्या तयारीसाठी अंबाजोगाईत सिबीएसई इंग्रजी माध्यमाची शाळा, डि.एड,बी.एड्,फार्मसी कॉलेज,मॅनेजमेंट कॉलेज सुरु करण्यासाठी प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांचे मार्गदर्शन लाभले. व सातत्याने त्यांनी याबाबत पाठपुरावा केला.त्यामुळे न्यु होराझन अ‍ॅकॅडमी सुरु केली.या अ‍ॅकॅडमीत तज्ञ प्राध्यापक ई लर्निंग,ई-लाय्रबरी,स्टडी मटेरियल,वसतीगृह, प्रशस्त इमारत,उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या सर्व प्रकारचे शैक्षणिक सोयी सुविधा अंबाजोगाईत उपलब्ध झाल्याने 100 टक्के यशाची खात्री व क्वॉलिटी एज्युकेशन आम्ही देणार आहोत. अंबाजोगाईचे टॅलेंट हे जगात नावारुपास यावे व शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मोदी म्हणाले.प्रारंभी प्रा.डी.किरण यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार प्रा.शिवकुमार यांनी मानले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.