लिंबागणेश:- ( दि.३१ ) बीड तालुक्यातील पिंपरनई ग्रामपंचायत अंतर्गत गणेशनगर वस्तीवरील ग्रामस्थांची पावसाळ्यात चिखलातून होणारी पायपीट, मुलांच्या शाळा, बाजारहाट,दवाखाना आदी कामांसाठी पावसाळ्यात चिखल तुडवीत होणारी ससेहोलपट ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन रस्तकाम सुरू केल्याने थांबणार आहे. बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली.यावेळी पिंपरनई सरपंच रतन सोनावणे,उपसरपंच बाळासाहेब वायभट, ग्रामसेवक सय्यद,वायभट,लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव, अंजनवतीचे बाळासाहेब मोरे पाटील, पांडुरंग वाणी, विक्रांत वाणी गणेशनगर वस्तीवरील रविंद्र वायभट, विकास वायभट, अशोक वायभट,सौरभ वायभट, लक्ष्मण वायभट,आश्रुबा वायभट,रामप्रभु वायभट, महादेव वायभट, माऊली वायभट, नवनाथ मानकर आदी.
ग्रामस्थ उपस्थित होते.
बीड तालुक्यातील मौजे.पिंपरनई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गणेशनगर वस्ती २५ वर्षांपासून वास्तव्यास असुन २५-३० घरांचा उंबरठा असलेल्या जवळपास १५० लोकसंख्या असलेल्या वस्तीवरील ग्रामस्थांची रस्ता नसल्याने पावसाळ्यात शालेय मुलांची शाळा,दुधदुभते, भाजीपाला, बाजारहाट आदि कामांसाठी पावसाळ्यात गुडघाभर चिखल तुडवीत जावे लागत असे.यारस्त्यासाठी गणेशनगर वस्तीवरील ग्रामपंचायत सदस्य कृष्णा वायभट यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला.आणि अखेर सरपंच, उपसरपंच यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून रस्त्याचे काम सुरू केले आहे.
रखडलेले मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करा :- डॉ.गणेश ढवळे
ग्रामीण भागात शेतवस्तीवर जाण्यासाठी दळणवळणाची साधने व मजुरांच्या हाताला काम मिळावे या उदात्त हेतूने मातोश्री ग्राम समृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजना अस्तित्वात आणली. मात्र शासकीय नियमांच्या कचाट्यात योजना सापडली असुन प्रसिद्धी माध्यमांद्वारे गाजावाजा करण्यात आलेल्या योजनेचे वास्तव क्लेशदायक आहे. शासकीय नियमांमुळे ग्रामस्थांना स्वखर्चाने रस्ते करण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील शासनाने मंजुरी दिलेल्या २०७४ कामांपैकी केवळ ४४८ कामेच म्हणजे २३ टक्केच कामे पूर्ण झाल्याने ग्रामीण भागात ही योजना मृगजळ ठरू पहात आहे.ग्रामीण भागातील शेतवस्त्यांवरील ग्रामस्थांना शाळा, दुधदुभते, भाजीपाला, बाजारहाट, शेतमाल वाहतुकीचा प्रश्न प्रलंबित आहे. दरवर्षी पेरणीसाठी बी बियाणे नेताना त्याचबरोबर पिक काढल्यानंतर शेतीमाल वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत असुन प्रलंबित पाणंद शेत रस्ता कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.