महाराष्ट्र राज्यराजकारण

बुलढाण्याच्या खासदाराने दहा वर्षांत काय काम केलं हे कळवा आणि हजार रुपये मिळवा!

आठवडा विशेष | प्रतिनिधी : बुलढाण्यात मेहकरला परिवर्तन यात्रेचे जंगी स्वागत झाले. डॉ. राजेंद्र शिंगणे त्यावर म्हणाले, मेहकरच्या सभेची गर्दी पाहता बुलडाणा येथे परिवर्तन अटळ आहे. बुलडाण्याच्या खासदाराने दहा वर्षांत काय काम केलं हे कळवा आणि हजार रुपये मिळवा! इथं जिल्ह्यात पाणी नाही आणि खासदार लोकसभेत सांगतात की जिल्ह्यात अतिवृष्टी झाली!

प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सादरीकरण पद्धतीने सत्ताधाऱ्या़ंची पोलखोल केली. तर अजितदादांच्या भाषणाला मेहकरच्या जनतेने समरसून दाद दिली. दादा म्हणाले,
आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. आम्ही वचनपूर्तीवर भर देतो. आज एकही घटक फडणवीस सरकारच्या कारभारावर समाधानी नाही. दुष्काळाने महाराष्ट्र होरपळतोय. पण सरकार ढिम्म आहे. आम्ही वारंवार सरकारकडे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. मात्र सरकार हलत नाही.
आम्ही प्रयत्न करायचो की शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली यावी. त्यासाठी विविध प्रकल्प आणले. साडेचार वर्षे झाली या सरकारला किती प्रकल्प आणले? आता या सरकारने नवी टुम काढली आहे. शेतकऱ्यांच्या खर्चावर दुप्पट हमी देऊ म्हणतात, आधी दीडपट हमी भाव तर द्या.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.