ज्येष्ठ महिला नागरिक संघाने पटकावले प्रथम पारितोषिक ; महाराष्ट्र महिला मेळाव्यात दमदार सादरीकरण

अंबाजोगाई: येथील ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या वतीने औंध (पुणे) येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक संघाच्या मेळाव्यात योगेश्वरी देवीचा महिमा सांगणारे गीत सादर केले.या गीतास महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळाला.आपल्या दमदार सादरीकरणाने पुणेकरांची मने जिंकुन ज्येष्ठ महिला नागरिक संघाने प्रथम पारितोषिक पटकावले याबद्दल ज्येष्ठ महिला नागरिक संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

औंध (पुणे) येथे नुकतेच जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात अंबाजोगाई येथील ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या प्रमुख कमलताई बरूळे, चंद्ररेखा मुळे,सरस्वती फड,ताई मुंडे,केशरताई पोतदार,ललिताताई भारजकर,मंदाताई काळम,ललीताताई पुजारी,चंदाताई जव्हेरी व श्री.एस.एन.जोशी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.आकर्षक वेशभुषा करून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देवस्थान असणार्‍या माता योगेश्वरी देवी यांचा महिमा सांगणारे गीत सादर केले.या सादरीकरणास महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.गीत सादरीकरणात सहभाग घेणार्‍या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र व ज्येष्ठ महिला नागरिक संघास प्रथम पारितोषिक देण्यात आले.या कामगिरीबद्दल कुंडलिक पवार,मनोहर कदम,अ‍ॅड.अनंतराव जगतकर,धनराज मोरे, पद्माकर सेलमोकर आदींनी अभिनंदन केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.