१०वी चा निकाल आज १ वाजता ; SSC चा निकाल mahresult.nic.in वर पाहा

आठवडा विशेष टीम― मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या म्हणजेच एसएससी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज शनिवार दि.८ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
राज्य बोर्डच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या ९ विभागीय बोर्डाच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आलेली होती. गेले काही दिवस सोशल मीडियावर एसएससीच्या निकालाच्या विविध तारखा फिरत होत्या. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य बोर्डाला परिपत्रकाद्वारे सोशल मीडियातील तारखांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करावे लागले होते. अखेर राज्य मंडळाने गेल्या वर्षीच्याच तारखेला दि.८ जून निकाल जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायांकितप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येणार आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स:

निकाल पाहण्यासाठी काय कराल ?

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
  2. खालील SSC Examination Result March 2019 याच्या खाली View Result लिंकवर क्लिक करा.
  3. व्हिएव रिल्झट पेज ओपन होईल.
  4. त्यानंतर प्रवेशपत्र क्रमांक (रोल नंबर),आई चे नाव आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
  5. काही क्षणात निकाल स्क्रिनवर दिसेल.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.