तीन महिन्यापूर्वी बलात्कार; काल झाला गुन्हा दाखल

परळी दि.०८:येथील जिजामाता उद्यानातून १९ वर्षीय मुलीचे अपहरण करून हैदराबाद येथे बलात्कार केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध तब्बल तीन महिन्यानंतर परळी पोलिसात गुन्हा दाखल केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की येथील सिद्धार्थ नगर भागातील १९ वर्षीय मुलीने दि.०७ जून रोजी संभाजी नगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शहरातील स्वप्निल गुंडाळे आणि राजू जाधव या दोघांनी ३ महिन्यापूर्वी येथील जिजामाता उद्यानातून आपले स्कार्पिओ गाडीतून अपहरण करून हैदराबाद येथे घेऊन गेले व दोन दिवस बलात्कार केला, त्यानंतर परळीत आणले असे पोलिसांना सांगितल्याचे समजते याप्रकरणी ३६३, ३६६ ,३७६ भादवि. ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीवायएसपी हे करीत आहेत.

परंतु याप्रकरणी शहरात उलटसुलट चर्चा होत असून तीन महिने पीडित मुलगी व तिचे नातेवाईक गप्प का? बसले पोलिसात गुन्हा का? दाखल केला नाही या सर्व प्रकरणामागे ब्लॅकमेलिंगचा प्रकार तर नाही ना? अशी उलट सुलट चर्चा होत असून पोलिसांनी योग्य तपास करावा अशीही चर्चा नागरीकात होत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.