बुधवार दि.12 जून रोजी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ समुपदेशन-2019 चे थेट प्रक्षेपण

तंत्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा -प्राचार्य एम.बी.शेट्टी

अंबाजोगाई: तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणार्‍या विद्यार्थी व पालक यांना सुयोग्य मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने बुधवार,दि. 12 जून रोजी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ- समुपदेशन-2019 चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुंबईहून थेट प्रक्षेपण दाखवण्याची सोय टी.बी.गिरवलकर,मोरेवाडी,अंबाजोगाई येथे उपलब्ध आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ तंत्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्नीकचे प्राचार्य एम.बी.शेट्टी यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन मंडळ समुपदेशन-2019 या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्यातील आग्रगण्य विषय तज्ञ व उद्योजक हे इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे थेट प्रक्षेपणाद्वारे
(लाईव्ह) शंका निराकरण करतील.या कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक तंत्रनिकेतनच्या कौंसिलींग सेलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.सदर कार्यक्रमासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ व साधनसामुग्री बद्दलची,
विविध अभ्यासक्रम, त्याचे फायदे व पदविका (अभियांञिकी) प्रवेश प्रक्रिया याबाबतची
माहिती आर.बी.टी.ई. मार्फत संबंधीत संस्थांना
मुंबईहून थेट प्रक्षेपणा द्वारे(ऑनलाईन)देण्यात येईल.सदर कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून निवडलेल्या संस्थेच्या माध्यमातून एम.एस. बी.टी.ई व पॉलिटेक्नीक्स यांच्या मध्ये समन्वय साधण्यात येवून संबंधीत संस्थांना वेळोवेळी आर.बी. टी.ई.व कॉर्डीनेटर्स यांच्या मार्फत सुचना देण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्नीक, अंबाजोगाई यांना देण्यात आली आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ तंत्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्नीकचे प्राचार्य एम.बी.शेट्टी यांनी
केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.