दूरदृष्टीच्या नेत्यामुळे आष्टी नंतर आता पाटोदा शिरूरला येणार पाणी―हुले

बीड :आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुके म्हणून पाटोदा आष्टी शिरूर हे तीन तालुके प्रामुख्याने प्रथम स्थानी येतात, पण याच आष्टी-पाटोदा शिरूर मतदार संघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा सरपंच ते राज्यमंत्री पदापर्यंतची मजल गाठतो पण राज्याच्या विधानभवनात गेल्यावर आपल्या मतदार संघातील प्रश्नांवर अगदी जबाबदारी पुर्वक काम करतो असे सर्वसामान्य नेतृत्व राज्याचे माजी महसूल व पणन राज्यमंत्री सुरेश आण्णा धस(विद्यमान विधानपरिषद आमदार) हे नाव व हा आवाज राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात गाजला व भाजप सरकारच्या काळातही गाजत आहे.
आदरणीय अण्णांनी महसूल राज्यमंत्री असताना सरकारच्या नदीजोड प्रकल्पातून कुकडी ते मेहकारी व्हायवा सीना असे पाणी वळवण्याचा प्रस्तव सादर केला व आष्टी तालुक्यातील मेहकरी नदीवरील प्रकल्पात पाणी सोडून तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात यश आले, व गतवर्षी या प्रकल्पाचे पाणी मेहकारी धरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सुरेश धस आण्णा यांनी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले परंतु आष्टी बरोबरच माझ्या पाटोदा व शिरूर तालुक्यात सुद्धा पाणी आले पाहिजे म्हणून ते राज्यमंत्री असताना दुसरा एक प्रस्ताव सादर केला होता, तो पैठण येथील नाथसागर जलाशयातून पाटोदा शिरून-कासार,गेवराई व बीड तालुक्यातील काही भाग ये प्रकल्पातुन ओलिताखाली येणारा एक प्रस्ताव शासन दरबारी सादर केला होता, नाथसागरातील पाणी पाटोदा शिरूर तालुक्याला मिळणार होते, या प्रकल्पाला प्रशासकीय व अन्य काही अडचणीमुळे या प्रकल्पाला शासनाने परळी येथील विभागीय कार्यालयातून स्थगिती दिली गेल्याचे समजते.
बीड जिल्ह्यात नेहमीच दुष्काळसत्र सुरू आहे,दर दोन वर्षांनी किंवा वर्षाआढ दुष्काळ पडत आहे,शासनाच्या माध्यमातून तात्पुरती उपाययोजना केली जाते, गुरांना छावण्या चारा दिला जातो,पण पाटोदा शिरूर कासार व बीड तालुक्यातील खेडेगाव व शहरांना पाणीपुरवठा करणारे दुष्काळात साथ देणारा एकमेव प्रकल्प आहे तो म्हणजे उखंडा(बीड नगर शिरूर रोडलगत)असलेला हा पाटोदा तालुक्यातील एकमेव तलाव याच तलावातून पाटोदा व शिरूर तालुका व बीड तालुक्यातील काही खेडेगावांना याच तलावातून पाणीपुरवठा केला जातो, पण सर्वच खेडे व शहरे यांचा ओढा हा या तलावावर असल्याने हा तलावही कमी क्षमतेमुळे दुष्काळाच्या शेवटी शेवटी संपण्याच्या मार्गावर येतो म्हणून नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर रामराम करत भारतीय जनता पक्ष स्वीकारला व पक्षाने त्यांच्या नेतृत्वाची चुणूक पाहून लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषदेचे आमदार केले व मग पुन्हा एकदा सुरू झाले ते सर्वसामान्य जनतेच्या नेते सुरेश आण्णा धस यांचे जिल्ह्यातील समस्या पाणीपुरवठा योजना, दुष्काळ निवारण व जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची सुरवात झाली.
चालू वर्षात २०१८ च्या दिवळीपासूनच आष्टी-पाटोदा व शिरून तालुक्यातील काही खेडेगावात पाणीटंचाई सुरू झाली व गावाला टँकर सुरू झाले,गावात रोज टँकरने पाणी येत आहे, पण या टँकरच्या पाण्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत, हे अण्णांनी पाहिलं,गावागावात वयक्तिक भांडणे, दूषित व पिण्यासाठी योग्य नसणारे पाणी व खुप दूरवरून पाण्यासाठी वणवण या तीन तालुक्याला करावी लागत आहे,म्हणून सुरेश आण्णा धस यांनी राज्याचे महसूलमंत्री असताना आदरणीय पवार साहेबांकडे माझ्या आष्टी-पाटोदा शिरुरला नेहमीच पाण्यासाठी वणवण करावी लागते म्हणून आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून कुकडीचे पाणी मेहकरी धरणात टाकण्याची व दुसरा प्रकल्प नाथसगराचे पाणी माझ्या शिरूर व पाटोदा तालुक्या बरोबरच बीड व गेवराई तालुक्यातील काही गावांना पाणी मिळेल या हेतूने नाथसागर ते पाटोदा असे पाणी द्या ह्या दोन अण्णांनी केल्या व त्या मागण्याला पवार साहेबांनी मान्यता दिली होती, त्यातील नाथसागर ते पाटोदा हा प्रकल्प काही प्रशासकीय अडचणीमुळे स्थगित करण्यात आल्याचे कळते, परंतु अण्णाच्या प्रयत्नाने कुकडीचे पाणी हे मेहकरी प्रकल्पात गतवर्षी येऊन पोहचले.
गतवर्षीच्या दुष्काळाची दाहकता व पाण्यासाठीची वणवण पाहून राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे तात्पुरती दुष्काळ निवारण करण्यासाठी पैठणच्या नाथसगराचे पाणी शिरूर तालुक्यापर्यत कायस्वरूपी द्यावे व आमच्या मतदार संघातील शेतकरी शेतमजूर व नौकरदार वर्ग यांची दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठीची वणवण थांबेल यासाठी लेखी प्रस्ताव व प्रकल्प अहवाल सादर करून विनंती केली होती,या विनंती व अहवाल यांचा योग्य नियोजनपुर्वक अभ्यास करून राज्य शासनाने या प्रकल्पाला तात्काळ नाही तर कायमस्वरूपी मजुरी देऊन या प्रकल्पास हिरवा कंदील दिला आहे,या प्रकल्पाला राज्य सरकार ४००कोटीचा निधी देणार असून पुढच्या आठवड्यात या प्रकल्पाला विधिमंडळात मंजुरी देणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले आहे,

असे असेल प्रकल्पाचे स्वरूप…

या योजनेतून सुरवातीला जायकवाडीच्या नाथसागर जलाशयातून शिरुर तालुक्यातील घोगस पारगाव या गावातील प्रकल्पात पाईपलांच्या माध्यमातून आणले जाणार आहे व तेथील पाणी लिप्ट करून ते पाटोदा शिरूर शहर व तालुक्यातील लगतच्या खेडेगावांना व गेवराई व बीड तालुक्यातील काही गावांना या प्रकल्पाचा पिण्याचे पाणी व थोड्याफार प्रमाणात शेतीला पाणी या प्रकल्पातुन मिळत असल्याचे सांगितले जाते आहे.
औरंगाबाद येथे मराठवाडा विकास मंडळाच्या वतीने दुष्काळ संबंधात स्वयंसेवी संस्थांची बैठक घेण्यात आली.राज्यातील सर्वधिक दुष्काळी परिस्थितीचा फटका बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याला बसला आहे, यामध्ये बीड जिल्ह्यात ११ तालुके आहेत त्यापैकी आष्टी-पाटोदा शिरूर कासार हे तालुके दुष्काळ यादीत टॉपवर असतात. ही योजना प्रत्यक्षात अवतारायला काही वर्षाचा काळ जाईल परंतु अमलात आल्यानंतर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील पाण्याचा काही अंश सुटणार आहे, हा केंद्रेकर यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार याप्रकल्पात काही ठिकाणी पाईपलाइनचा उपयोग केला जाणार आहे.त्यानंतर पाणी शिरूर व पाटोदा शहरासाठी लिप्ट केले जाणार असल्याचे समजते.त्यामुळेच बीड आणि उस्मानाबाद योजनेत सरकारने अधिकांश ठिकाणी पाईपचा वापर करण्याचा निर्णय घेतल्याने योजना निश्चित यशस्वी होईल यात शंका नाही.
जायकवाडी धरणातून बीड व उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी हा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी तयार केला आहे,ही योजना अंमलात येणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे ही योजना विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेब यांच्या कार्यकाळात पूर्ण व्हावी अशी इच्छा दोन्ही जिल्ह्यातील जनतेकडून येत आहे.
हे जायकवाडीतून बीड जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्याला पाणी मिळणार आहे, या सर्व माहितीचा आढावा पाटोदा तालुक्यातील शेतकरी पुत्र इंजि.हुले दत्ता बळीराम याने मराठवाडा पाणीपुरवठा विभागाचे प्राशासकीय अधिकारी, आमदार सुरेश धस यांचे स्वकीय सहाय्यक सुशील ढोले, पाटोद्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नासाठी न्यायालयात धाव घेणारे ऍड.अरुण कोठुळे व पाटोदा तालुक्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व शेतकऱ्यांचे नेते राजाभाऊ देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण चर्चेतून संक्षिप्त केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.