टेक्नॉलॉजीमहाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध समस्यांसाठी पंकजाताई मुंडे यांना निवेदन देण्यात आले ; अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

प्रतिनिधी दि.०७ :आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध समस्यांसाठी संघटनेच्या पदाधिका-यांनी पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांबद्दल निवेदन दिले.

राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला रहीवाशी,बांधकाम परवाना, पेटीआर नक्कलयासह सर्व २९ प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतीचे संपूर्ण जमा खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभा यांचे ऑनलाईन कामकाज, चौदाव्या वित्त आयोगाचे गाव विकास आराखडे यासह ग्रामपंचायतेतील इतर काम संगणक परिचालक करतो. शेतकरी कर्जमाफी माफी, अस्मिता योजना, जनगणना, सध्या राज्यात सुरु असलेला लाखो कुटुंबांचा घरकुलांचा सर्व्हे, प्रधानमंत्री पिक विमा योजना इत्यादी अनेक प्रकारची कामे मागील सात वर्षांपासून राज्यातील हजारो संगणक परिचालक करीत आहेत. संगणक परिचालकांना मानधनासह इतर येणाऱ्या अडचणी शासनाच्या वतीने सोडवण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी कोल्हापूरचे विशाल चिखलीकर, चंद्रपूरचे देवेंद्र गेडाम, गोंदियाचे जितेंद्र सांक्रेजी, भंडारा चे नवनित बेहेरे, नागपूरचे अमित लोखंडे, साताऱ्याचे सुहास शितोळे, सांगलीचे अमोल पाहिल, अमरावतीचे सिद्धार्थ मनोहरे, वाशिमचे गोकुळ राठोड, सोलापूरचे प्रदिप शिंगे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button