बीड: जिरेवाडी परिसरात काळवीटाचा मृत्यू : संबधित अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा

बीड: आठवडा विशेष टीम―शहरापासून जवळच असणार्या जिरेवाडी येथे वनविभागाची नर्सरी आहे. त्या परिसरात आणि आजू बाजूला व रामगड परिसरात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे वन्यप्राणी भंटकती करत आहेत. पाण्याच्या शोधात असलेल्या काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना जिरेवाडी परिसरात घडली आहे. त्यामुळे संबधित अधिकार्याची चौकशी करून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांना राज्यशासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जिल्हाधिकारी बीड ,महसूल व वन विभाग मंञालय मुंबई आणि सामान्य प्रशासन विभाग मंञालय मुंबई यांच्याकडे आँनलाईन लेखी तक्रार दाखल केली आहे व संबधित तक्रारीचा ईमेल पंतप्रंधान कार्यालय,राष्ट्रपती कार्यालय,राज्यपाल महाराष्ट्र राज्य ,विभागीय आयुक्त औरगीबाद यांच्यासह ईतर कार्यालयाकडे ईमेल व्दारे तक्रार दाखल केली आहे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे कि, शहरापासून जवळच असणार्या जिरेवाडी येथे वनविभागाची नर्सरी आहे त्या परिसरात आणि आजू बाजूला व रामगड परिसरात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे वन्यप्राणी भंटकती करत आहेत त्यांमुळे रामगड परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे उभारण्यात यावेत साठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निलेश चाळक यांनी आपले सरकार पोर्टलवर आँनलाईन तक्रार क्रं:-DIST/CLBE/2019/ 3157 दि,06/04/2019 रोजी दाखल केली होती त्या तक्रारीच्या अनुंशगाने महसूल तहसिलदार जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी दि,16/04/2019 रोजीच्या पञाने पञ क्रं:-जा.क्रा.2019/मशाका/कक्ष -3/पिपाटं-/कावी-881 विभागीय वनअधिकारी यांना कळवले होते कि,अर्जदार निलेश चाळक यांनी केलेल्या तक्रारीच्या प्रकरणात प्रस्तूत केलेल्या मुद्यांची तातडीने दखल घेवून वस्थुतिथीची चौकशी करावी व मौजे जिरेवाडी,ता,जि,बीड येथील रामगड जवळील परिसरात आपण प्रत्यक्ष भेट देवून वन्य जीव पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहाणार नाही व
तिथे तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल या द्रुष्टीने तातडीने नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाही बाबत अर्जदार यांना अवगत करण्याचे कळवले होते परंतू मा,विभागीय वन अधिकारी यांनी या प्रकरणावर माझ्यासोबत कुठल्याही प्रकारचा पञव्यवहार केलेला नाही आणि कार्यवाही ही केली नसल्यामुळे संबधित अधिकार्यावर दफ्तंर दिरगाई कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी व जिरेवाडी येथील रामगड परिसरात आणि करपरा नदीच्या वरील भागात प्रशासनाकडून पाण्याची व्यवस्था केली नसल्यामुळे जिरेवाडी येथील करपरा नदी परिसरात काळविटाला पाणी पिण्यासाठी मिळत नसल्याने सात ते आठ दिवसापुर्वी काळविट मृत्यू मुखी पडल्याची घटना घडली आहे काळविटाचा मृत्यू झाला जी घटना येथील शेतकर्यांना समजली तेव्हा त्यांनी याबाबत संबधित वनरंक्षक यांना कळवले होते परंतू संबधित वनरक्षंक यांनी ही गोष्टीकडे गांभिर्याने पाहीले नाही आणि याबाबत आपल्या वरीष्ठ अधिकार्यांना ही कळवले नाही. जेव्हा काळवीटाच्या मृत्यू ची बातमी दैनिक कार्यारंभ ने प्रकाशित केली तेव्हा हा प्रकार समोर आला व सदर काळविटाचा
मृत्यू हा पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे झाला असल्याने या काळविटाच्या मृत्यूस कारणीभुत जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांची चौकशी करून संबधितावर वर वन्य जीव संरक्षण कायदा 1972 नुसार योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.