मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी मुंडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ ऊडाली आहे.पुस ता.अंबाजोगाई येथे प्रस्तावित जगमित्र शुगर्स या साखर ऊद्योगासाठी धनंजय मुंडे यांनी केलेले तब्बल सत्तर एकरहुन अधिक जमिनींच्या व्यवहारांमध्ये गैरप्रकार व खोटे दस्तऐवज आढळल्याचे पोलिस तपासांत समोर आले असुन तपास अधिकाऱ्यांनी यातील बलखंडी बुवा संस्थानाची इनामी जमीन लुबाडल्याप्रकरणी दिरंगाई केल्याबद्दल पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर शेलकी टिका करत आमदार सुरेश धस यांनी भाजप नेते अमित शहांना तडीपार म्हणुन हिणवनाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला व त्यांच्या नेत्यांना अनेक शेतकऱ्यांची जमिन लुबाडणारा, सरकारी जमिन हडपणारा, मयताची जमिन बळकावणारा, जिल्हा बॅक देशोधडीला लावुन जप्ती आलेला विरोधी पक्षनेता कसाकाय चालतो असा खणखणीत सवाल केला आहे.
सदरील प्रकरणी धनंजय मुंडे यांनी रत्नाकर गुट्टेंवरील गुन्ह्यांचा सुड म्हणुन कारवाई होत असल्याचे वादग्रस्त विधान करत कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह ऊपस्थित केले आहेत.याचाही समाचार घेत सुरेश धस यांनी रत्नाकर गुट्टेंवर अपहाराचे गुन्हे दाखल झाले असुन त्यांच्यावर पाच दिवसांपुर्वीच इडी ने कारवाई करुन निपक्षीपाती धोरणाचा पुरावा दिलेला असुनही दहा वर्षांपासुन धनंजय मुंडेंनी पोलीसांनर दबाव आणत दाबलेले प्रकरण न्यायालयामुळे ऊजेडात आल्याचे सांगितले आहे.
प्रकरण धक्कादायक
इनामी जमीनींचे खरेदीखत आणि एनए करणं गुन्हा आहे कारस्थान नाही असे धस यांनी नमुद केले आहे.जगमित्र शुगर्स साठी तब्बल 23 हेक्टर जमिनींचे नियमबाह्य खरेदीखत करुन त्या जमिनीचा थेट एनए करण्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला असल्याचे पोलिस तपासांत समोर आल्याचा दावा त्यांनी केला.
बलखंडी बुवा मठसंस्थानची इनामी जमीन जिचे खरेदी खत नियमाने होत नसताना देखील विविध कौलनामा धारकांकडुन बेकायदेशीर खरेदी खत करुन गट क्र.21,22,34,35,36,37 मधील एकुण 23 हेक्टरहुन अधिक जमीनी बळकावण्यात आली आहे.
याबरोबर 41 एकर जमीनीचा अकृषी परवाना (एनए)झाला असताना साखर आयुक्तालयात 65 एकर चा एनए झाल्याचे तसेच कारखान्याचे 80% बांधकाम झाले असल्याचे व यंत्रसामुग्री ची तरतुद केल्याबाबतचे खोटे शपथपत्र 2016 साली धनंजय मुंडे यांनी सादर करुन शासनाची फसवणुक केली असल्याचाही आरोप धस यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंच्या जगमित्र शुगर्सचा गोलमाल !
अंबाजोगाई येथील न्यायालयात विधान परीषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुक, लुबाडणुक करण्याच्या उद्देशाने खोटी कागदपत्रे सादर करणे आदी गुन्ह्यांबद्दल डिसेंबर महीन्यात चार्जशीट दाखल करण्यात आलेले आहे.पोलिसांनी धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड व सुर्यभान मुंडे या तिघांवर भा.द.वि. 420,सहीत 465,468,419 इत्यादी कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत.
प्रस्तावित जगमित्र शुगर्स साठी 2010 साली जमीन ताब्यात घेताना त्या भागातील शेतकऱ्यांना विविध आश्वासने देऊन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जमिनी मिळवल्या होत्या.जमिनीच्या मावेजाचे पैसे दिलेला धनादेश न वठने, इनामी जमिनींचे बेकायदेशीर खरेदीखत करणे, 1988 मध्ये मयत व्यक्तीची जमीन 2010 साली खोटा अंगठा लावुन लुबाडणे यासह साखर आयुक्तालयाला दिलेल्या शपथपत्रात खोटी माहीती देऊन शासनाची फसवणुक करणे,महसुल यंत्रणेत खोट्या नोंदी करुन बोगस एनए करने असे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
वृद्ध शेतकरी मुंजा गितेचा एकाकी लढा
मुंजा गित्ते या पुस ता.अंबाजोगाई येथील शेतकऱ्याची गट नं. 36 मधील 3 हेक्टर 12 आर जमीन पन्नास लाख रुपये व चार जणांना नोकरी असे आश्वासन देऊन धनंजय मुंडे यांनी जगमित्र शुगर्स या त्यांच्या नियोजित साखर कारखान्यासाठी खरेदी केली होती.ती खरेदी करताना केवळ दहा लाख रुपये दिल्याचे मुंजा गित्ते यांचे म्हणणे असुन ऊर्वरीत रक्कम वारंवार मागणी केल्यानंतर चाळीस लाख रुपयांचा धनंजय मुंडे यांच्या सहीचा धनादेश गित्ते यांना जुन 2015 मध्ये देण्यात आला.
हा चाळीस लाख रुपयांचा धनादेश वठला नाही.या प्रकरणी गित्ते यांनी जंग जंग पछाडल्यानंतर 8 सप्टेंबर 2015 रोजी बर्दापुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. मात्र राजकीय दबावापोटी आरोपपत्र सादर करण्यासाठी पोलिस यंत्रणा टाळाटाळ करत असल्याने फिर्यादी मुंजा किसनराव गित्ते यांनी उच्च न्यायालया पर्यंत न्यायालयीन लढाई लढली.अखेर त्यांच्या लढ्याला यश येऊन तब्बल तीन वर्षानंतर आरोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे नुकतेच दाखल झाले असुन त्यांना अंतिम न्यायाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
मयत व्यक्तीकडुन घेतली मुंडे यांनी जमीन?
जगमित्र शुगर्स साठी जमिन देणाऱ्यांमध्ये
ज्ञानोबा सिताराम नामक आदीवासी व्यक्तीची चार एकर जमिन आहे.28 डिसेंबर 2010 मध्ये या व्यक्तीने संमतीपत्राद्वारे त्याची जमीन जगमित्र शुगर्स ला स्वखुशीने बहाल केल्याचे कागदपत्र जगमित्र शुगर्स ने शासनाला सादर केले होते. पोलिस तपासांत मात्र सनसनाटीपुर्ण तथ्य समोर आले आहे. सदरील व्यक्ती ज्ञानोबा सिताराम 14 सप्टेंबर 1988 रोजी वीज पडुन मृत्युमुखी पडलेली असल्याचे आरोपपत्रात पोलिस यंत्रणेने मृत्यु प्रमाणपत्र व बोगस कागदपत्रांसह सादर केले आहे. तब्बल बावीस वर्षांपुर्वी मयत व्यक्तीची जमिन त्याच व्यक्तीकडुन खरेदी करण्याचा चमत्कार धनंजय मुंडे यांनी केला आहे.द.वि.420,465,468 व 419 या कलमांनुसार आरोपींना 7 वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतुद असुन अशा कलमांसह विरोधी पक्षनेत्यांना सरकारवर कठोर प्रहार करण्याची नैतिकता आहे का असाही प्रश्न ऊपस्थित केला जाऊ शकतो.
धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या जगमित्र सुतगिरणीने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅन्केच्या बुडीत तेरा कोटी रुपयांच्या थकीत कर्जाबद्दल काही दिवसांपुर्वी मालमत्ता जप्तीची कारवाई झाली होती. त्यानंतर आता जगमित्र शुगर्स च्या जमिनींचे सारे व्यवहार संदेहास्पद ठरुन थेट धनादेश न वठने,बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यक्ती व शासनाची फसवेगिरी करणे आदी आरोपांचे चार्जशिट धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादी क्राॅगेस पक्षाला गोत्यात आणणारे ठरणार आहे.