गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान क्षणिक प्रसिद्धीसाठी नसावा तर,त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा व पाठबळ देणारा असावा―दत्ता हुले

पाटोदा:आठवडा विशेष टीम―यावर्षीही नेहमीप्रमाणे इयत्ता दहावी व बारावी या दोन वर्गाचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला आहे, विद्यार्थ्यांचा आयुष्यातील पहिला व दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट असे गुण संपादन करून विद्यार्थी दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झाले.
चांगल्या मार्कने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा नक्कीच सन्मान व्हायला पाहिजे, हे अगदी बरोबर आहे,प्रत्येक जन आपल्या-आपल्या माध्यमातून सन्मान सोहळा आयोजित करतात.
अगदी मोठया थाटामाटात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत व समाजापासून लोकशाहीपर्यत सन्मान सोहळे पार पाडतात.
खाजगी शिकवणीवाले (खाजगी क्लास) सन्मान सोहळा आयोजित करतात ही गोष्ट त्यांच्या विकसित व्यावसायासाठी व व्यवसायास भरारी देण्यास मदत करते म्हणून ते सन्मान सोहळा आयोजित करतात, पण हल्ली खेडोपाडी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी काही सामाजिक संघटना, युवा नेते,बचत गट,विविध ग्रुपच्या माध्यमातून सन्मान सोहळा आयोजित केला जातो, मोजक्याच गुणवंत विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ, सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांसह पालकांचा सन्मान केला जातो, हे अगदी योग्य आहे,कारण याच सन्मानातून या विद्यार्थ्यांला एक वेगळी प्रेरणा व बळ मिळते,पण अलीकडे कुठेतरी हेच सन्मान सोहळे व कार्यक्रम फोल वाटायला लागले आहेत, कारण मोजकेच लोक, मोजकेच विद्यार्थी सहभागी होतात असे हे सोहळे पार पाडतात, व दुसऱ्या दिवशी अगदी प्रसिद्धी पत्रके व मध्यमावर हे सन्मान सोहळे थैमान मांडता, म्हणूनच सन्मान सोहळे हे क्षणिक प्रसिद्धीसाठी नसावे तर त्या गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणासाठी प्रेरणा व पाठबळ देणारे असावेत कारण सन्मान सोहळे फक्त यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचेच होतात,परंतु परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात आलेलं दडपण व मानसिक संतुलन यामुळेही काही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, त्यामुळे सन्मान सोहळा आवश्यक घ्या ,पण याच सन्मान सोहळ्यातून २००-२५० रुपये खर्च करून त्या विद्यार्थ्यांला सन्मान वाटण्यापेक्षा जर १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गरीब कुटुंबातील, अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना जर पुढील शिक्षणासाठी फुल नाही पण फुलाची पाकळी या हेतूने शैक्षणिक साहित्य, वही, रजिस्टर, पुस्तके,कॉलेज प्रवेश फिस जर या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून जर गरजू विद्यार्थ्यांना दिले तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणासाठी एक वेगळी प्रेरणा व पाठबळ मिळल्याशिवाय राहणार नाही तालुका व जिल्ह्यापातळीवरील सर्वच क्षेत्रातील मंडळींना सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारा विद्यार्थी दत्ता बळीराम हुले याने सर्वांना विनंतीपुर्वक आव्हान केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.