➡नगरपंचायतची अग्नीशामक गाडी मंजूर ,आणायला मात्र मुहूर्त सापडेना
➡सय्यद शाहानवाज, नगरसेवक वसीम शेख, गणेश कवडे,सुनिल काळे,पञकार विलास भोसले ,दत्ता वाघमारे व शेजारी,असलेल्या दुकानदाराच्या अथक परिश्रमा मुळे मोठी दुर्घटना टळली
आठवडा विशेष |गणेश शेवाळे
पाटोदा (जि.बीड):पाटोदा पंचायत समिती कॉम्प्लेक्स शेजारी शिवाजी साठे यांचे झेरॉक्सचे दुकानं असून दुपारच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागल्याने तहसिल व नगरपंचायत जवळ असल्याने बग्यांची मोठी गर्दी जमली होती आगविजवण्यासाठी पाटोदा शहरात कोणतेही यंत्रणा नसल्यामुळे आग विजवणार्याची मोठी तारांबळ उडाली पण प्रसंगाचे गांभीर्य राखून युवानेते सय्यद शाहनवाज, नगरसेवक वसीम शेख, गणेश कवडे,सुनिल काळे ,पञकार विलास भोसले, दत्ता वाघमारे व शेजारी असलेल्या सर्व दुकानदारानी अथक परिश्रम घेऊन आग विझवली.आग काही वेळ राहिली असती तर पाटोद्यात मोठी दुर्घटना घडली असती यामुळे बग्याच्या जमलेल्या गर्दीतून एकच चर्चा होती पाटोदा नगरपंचायतने अग्नीशामक गाडी मंजूर केली तर कुठे गेली का तिला आणायला नगरपंचायतला मुहूर्त सापडेना अग्निशामक गाडी पाटोदा येते असती तर गरीब दुकानदार शिवाजी साठे यांची लाखो रुपयांची मशनरी वाचली आसती