सि.बी.एस.ई 10 वी व नीट परिक्षेतील गुणवंतांनी उंचावले अंबाजोगाईचे नांव

न्यु व्हिजन पब्लिक स्कुल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अंबाजोगाई :आठवडा विशेष टीम― येथील श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुल या सिबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 10 वी वर्गात विशेष प्राविण्य मिळविणार्‍या व नीट परिक्षेत उत्तीर्ण होवून वैद्यकिय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बुधवार,दि.12 जून रोजी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी.जोशी,संजय दौंड,प्रा.वसंतराव चव्हाण,डॉ.डी.एच.
थोरात,टि.बी.गिरवलकर पॉलिटेक्नीकचे प्राचार्य एम.बी.शेट्टी,न्यु व्हिजनचे प्राचार्य तुषार चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते सिबीएसई इंग्रजी माध्मामाच्या शाळेत इयत्ता 10 वी वर्गात विशेष प्राविण्य मिळविणार्‍या 29 व नीट परिक्षेत उत्तीर्ण होवून वैद्यकिय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या 6 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्प असे होते.या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्राचार्य डॉ.यु.डी.जोशी यांनी आयुष्यात सकारात्मकता असेल तर सर्व काही शक्य होते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जात ध्येय व जिद्द ठेवून यश संपादन करावे असे आवाहन केले.तर यावेळी डॉ.डी.एच. थोरात यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.पालक प्रतिनिधी बालासाहेब मस्के यांनी संस्थेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी व शालेय व्यवस्थापन समिती यांचे आभार मानत विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये संस्थेचे महत्व असल्याचे सांगितले.न्यु व्हिजनचे प्राचार्य तुषार चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्य चव्हाण म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेष गारठे यांनी करून उपस्थितांचे आभार शिवकांत बेटगिरी यांनी मानले.

न्यु व्हिजन म्हणजे दर्जेदार इंग्रजी शिक्षण -राजकिशोर मोदी

मुंबई,पुणे,नागपुर व औरंगाबादच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अंबाजोगाईत न्यू व्हिजन पब्लिक स्कूल सुरू केले.सतत आठ वर्षे 100% निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवत्ता जोपासली आहे.आज या संस्थेचे माजी विद्यार्थी हे देशात व परदेशात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेञात अंबाजोगाई पॅटर्न निर्माण केला आहे. नर्सरी.,एल.के.जी., यु.के.जी.,पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.प्री. प्रायमरीसाठी मणीपुर व नागालँड येथील अनुभवी,तज्ञ शिक्षिका, शिक्षकवृंद आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास, सुसज्ज ग्रंथालय, ऑडिओ व्हिज्युअल क्लास रूम,अत्याधुनिक प्रयोगशाळा,वायफाय परिसर,भाषा विषयक प्रयोगशाळा,गणित व विज्ञान प्रयोगशाळा,ई-लर्निंगद्वारे प्रशिक्षण, प्रत्येक वर्गात सिसिटीव्ही कॅमेरा, कला,हस्तकला,नृत्य, संगीत,कराटे प्रशिक्षण, पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत इमारत बास्केट बॉल ग्राउंड, प्रशस्त क्रिडांगण,स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंञ वर्ग या सोबतच सुसज्ज वसतीगृह,प्रत्येक खोलीत प्रसाधनगृह, प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी,संतुलित व पोषक आहार,दैनंदिन योगा आणि व्यायाम. सकाळी व संध्याकाळी अभ्यासवर्ग,अनुभवी व काळजीवाहक कर्मचारी वृंद,लाँड्री सुविधा, मुलींसाठी स्वतंञ सुविधा (सी.सी.टी. व्ही.खाली देखरेख),24 तास वैद्यकिय व विद्युत सुविधा यासोबतच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत,स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे याकरीता जे-जे करता येईल ते सर्वच सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा प्रयत्न आसल्याचे सांगुन गतवर्षी पासून संस्थेने सीबीएसई 11 वी विज्ञान वर्ग सुरू केले आहेत.अशी माहिती संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.