बीड: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जे माफ करा- गणेश कवडे

पाटोदा (गणेश शेवाळे): पाटोदा तालुक्याएवढा भयानक दुष्काळ महाराष्ट्रात कुठेच सापडणार नाही. आज प्यायच्या पाण्याची भयानक परिस्थिती तयार झाली आहे. कुठल्याच विहिरीला किंवा बोरला कसल्याही प्रकारचे पाणी राहिले नाही आणि तरीही सरकार कुठे दुष्काळ जास्त आहे याची अजून चाचपणी करत आहे. मागच्या वर्षी पूर्ण पावसाळ्यात एकच पाऊस पाटोद्यामध्ये झाला त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या परंतु पुन्हा पाऊस न झाल्यामुळे उडीद,मूग,तूर,कापूस व प्रमुख पिक सोयाबीन पूर्णपणे जळून गेले आहे. शेतकऱ्याच्या बियाणी खताचे सुद्धा पैसे निघाले नाहीत.शेतकऱ्यांनी पंतप्रधान विमा योजनेमध्ये शंभर टक्के पैसे भरले. शेतकऱ्यांना आशा होती विमा येईल म्हणुन परंतु मुग, उडीद, भुईमूग, तुर, कापूस या पिकाला अल्पसा टाकून शेतकऱ्यांची थट्टा केली. तरी शेतकरी शांत होता कारण प्रमुख पिक सोयाबीन असल्यामुळे सोयाबीनला भरपूर विमा येईल आणि आपला पेरणीचा खर्च निघेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु सरकार अजून पंधरा दिवसांची मुदत सांगत आहे. त्यामुळे आज विविध मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने गणेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

या आहेत प्रमुख मागण्या-

1)मागील खरीप हंगामातील सोयाबीन चा पिक विमा पेरणीपूर्वी वाटप करावा 2)सरसकट कर्जमाफी द्यावी 3)शेती पंपाचे वीज बिल माफ करावे 4)मागील शैक्षणिक वर्षाची विद्यार्थ्यांची परीक्षा व शैक्षणिक फी माफ करावी 5)सन 2016 रब्बीचा राहिलेल्या शेतकऱ्यांचा विमा तात्काळ द्यावा असे निवेदनात मागण्या केल्या आहेत यावेळी निवेदन देताना काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे,अण्णासाहेब राऊत,योगेश घुमरे, योगेश ढवळे,अनिल घुमरे, आनंद घुमरे, राजेंद्र जायभाय, महादेव येवले,संपत कदम,असे अनेक शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते जर या मागण्या मान्य नाही झाल्यास राष्ट्रीय काँग्रेस तीव्र आंदोलन करेल असे तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी सांगितले

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.