आ.भीमराव धोंडे यांचे प्रयत्नाने मुख्यमंत्री सहायता निधी मधुन रुग्णांना आज पर्यंत १ कोटी ६० लाखांची मदत

कडा (प्रतिनिधी): लोकप्रिय रस्तेमहर्षी आ. भीमराव धोंडे यांचे प्रयत्नाने आष्टी मतदारसंघातील विविध गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना आज पर्यंत १ कोटी ५७ लाखांची मदत मिळाली आहे.
आ.भीमराव धोंडे यांनी सन २०१४ ला आष्टी मतदारसंघाचे पुन्हा प्रतिनिधित्व स्वीकारले आणि विविध विकास कामांची धडाकेबाज सुरुवात केली, ती आज पर्यंत अविरत आहे. यामध्ये प्रामुख्याने आष्टी पाटोदा शिरुर या तालुक्यातील विविध रस्त्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लावला आहे. त्याच बरोबर पाणी प्रश्न असेल, शेती व त्या अनुषंगाने येणारे विविध अवजारे, पीक विमा, शेती अनुदान अशा योजना आणि सर्वात महत्वाचे लोकांना शांतता दिली या बाबी बरोबर अनेक गरीब लोक पैशाअभावी दुर्धर आजारावर उपचार घेऊ शकत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी उभा केला या निधीमधुन आष्टी पाटोदा शिरुर या तालुक्यातील ह्रदयरोग, कॅन्सर, किडनी, मेंदू आजार, लिव्हर व या प्रकारचे गंभीर आजाराने ग्रस्त जवळपास १६१ रुग्णांना १ कोटी ५७ लाख रु. निधी गेल्या चार वर्षात आ.भीमराव धोंडे यांनी मिळवुन दिला आहे. या निधीमुळे या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असुन वेळवर पैशांची तरतुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.भीमराव धोंडे यांचेमुळे झाल्याने यांचे प्राण वाचु शकले. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, मुंबई ,बीड ,सोलापूर या मोठ्या शहरातील अत्याधुनिक सोईने युक्त असलेल्या दवाखान्यात या रुग्णांना या निधी मुळे उपचार घेता आले. मुख्यमंत्री सहायता निधी मधुन अशा गंभीर आजारासाठी डाॅक्टरचे अंदाजपत्रक,तपासणी रिपोर्ट,उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार) आधार कार्ड ,रेशन कार्ड, फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहे. आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी मतदारसंघाव्यतिरिक्त बाहेरच्याही रुग्णांना निधी मिळवून दिला आहे या निधीसाठी शंकर देशमुख सरचिटणीस भाजप तथा स्वीय सहायक यांचे कडे संपर्क करावा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.