जी श्रीकांत मनपा आयुक्त यांना एका निवेदनाद्वारे काँग्रेस माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी मागणी केलेली आहे.
औरंगाबाद- महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात काँग्रेस माथाडी कामगाराचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी निवेदाद्वारे मागणी केलेली आहे. की, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना “पीएम स्वनिधी” हि योजना जुलै २०२० पासून सुरु आहे. त्यामध्ये मा. प्रधानमंत्री यांनी छोट्या-छोट्या व्यवसायिकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना “पीएम स्वनिधी” हि योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार बँकेकडून सुरवातीला १००००/- रुपये कर्ज भेटते व सदरील कर्जाची परतफेड केल्यानंतर २००००/- रुपये कर्ज भेटते. तसेच पुन्हा सदरील कर्जाची परतफेड केल्यानंतर ५००००/- रुपये कर्ज भेटते. जे छोटे-छोटे व्यवसायिक विक्रेते आहेत त्यासाठी उदा. भाजीपाला विक्रेता, फळ विक्रेता, किरकोळ किराणा दुकानासाठी तसेच छोट्या छोट्या अन्य काही व्यवसायासाठी हि योजना प्रत्येक जिल्हा, तालुका, गावांत लागु आहे. ज्या ज्या छोट्या छोट्या व्यवसायिकांनी १००००/- व २००००/- रुपये कर्ज घेऊन वेळेवर परतफेड केली आहे. त्या लाभार्थीना संबंधित बँका पुढील ५००००/- रुपयांचे कर्ज देण्यास टाळाटाळ करून मनमानी करत आहेत. त्यामुळे गरजु लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील या योजने अंतर्गत महानगरपालिकेच्या हद्दीत ज्या ज्या बँक येतात त्यांना या योजनाचे पालन करणे हे अनिवार्य आहे.
महानगरपालिका आयुक्तांना शहरातील सर्व बँकेच्या मुख्य शाखांना पत्र देऊन गरजु नागरीकांना कर्ज वितरण करण्यासंबंधी आदेशित करावे अशी मागणी सय्यद अशफाक अली यांनी केली आहे.