ब्रेकिंग न्युज

फडणवीस-ठाकरेंची जोडी एकत्र येणार

आगामी निवडणुकांच्या तोंडावर नवीन समीकरणे जुळण्याची शक्यता

पुणे, ११ जानेवारी २०२४

राज्यात महायुतीच्या महाप्रचंड विजयानंतर आता देवेंद्र फडणवीस सरकार स्थिरावले आहे.नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची आता शक्यता आहे.केंद्रात अल्पमतात असलेल्या भाजपला मित्र पक्षाच्या मदतीने आणखी भक्कम करण्याचा आणि नरेंद्र मोदी सरकार आणखी स्थिर करण्यासाठी शक्यतांची चाचपणी सुरू झाली आहे. ठाकरेंना पुन्हा भाजप सोबत आणण्यासंबंधीचा प्रयोग केला जात असल्याचे चित्र उद्धव यांच्या स्वबळावर मनपा निवडणुका लढण्याच्या संकेतांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा, इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.११) केला.

उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्यानंतर शिंदे गटासंबंधीचा पेच भाजप समोर उभा राहू शकतो. पंरतु, इतर. राजकीय पक्षांसह शिंदेंना योग्यरित्या हाताळण्यात आतापर्यंत भाजप यशस्वी झाले आहे, भविष्यातही होईल, असा दावा पाटील यांनी केला.विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंना भाजपसोबत आणण्याच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती केली जात आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांना याचा फायदा होईल.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरेंनी अनपेक्षितपणे फडणवीसांची भेट घेत त्यांचे कौतुक केले. सामनातून संजय राऊत यांनी देखील फडणवीसांचे कौतुक केल्याचे महाराष्ट्राने बघितले. ठाकरे-फडणवीस पुन्हा सोबत येतील, हे या सर्व घडामोडीवरून ठामपणे सांगतो येत असल्याचे पाटील म्हणाले.

शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील मागच्या दाराने भाजप सोबत चर्चा सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रादेशिक पक्षांना त्यांच्या खासदारांना सोबत घेवून केंद्रातील मोदी सरकारला आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न भाजपच्या केंद्रीत नेतृत्वाचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती परत आणण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या भाषणात केली होती. उद्धव ठाकरे शत्रु नाहीत, आता राज ठाकरे मित्र आहेत. महाराष्ट्रात बदल घडवण्याचे राजकारण करायचे आहे, बदल्याचे नाही,असे वक्तव्य फडणवीस यांनी नुकतेच नागपूर येथे केले आहे.यावरून हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनेला भाजप गोंजारत असल्याचे पाटील म्हणाले. ९ खासदारांचे संख्याबळ भाजपला खुनावत असल्याचा दावा पाटील यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button