धनंजय मुंडेंवरील गुन्हा कायम, त्यांनी प्रसारमाध्यमांची दिशाभुल करु नये―राजाभाऊ फड

आठवडा विशेष टीम―बेलखंडी बुवा मठ संस्थान जमिन अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील गुन्हा रद्द केलेला नाही.
तक्रारकर्त्यांनी दाद न देणाऱ्या बर्दापुर पोलिसांविरुद्ध पोलिस अधिक्षक आणि जिल्हा न्यायालयात दाद न मागता ऊच्च न्यायालयाकडे दाद मागणं अनुचित आहे एवढ्या तांत्रिक कारणांनी ऊच्च न्यायालयाच्या आदेशांवर आजची स्थगिती दिलेली असली तरी पोलिसांनी गुन्हा आज सकाळीच दाखल झाल्याने धनंजय मुंडेंना पोलिस कारवाईपासुन दिलासा नाही असे या प्रकरणातील याचिकाकर्ते राजेभाऊ फड यांनी नमुद केले आहे.
धनंजय मुंडे यानिमीत्ताने सर्वोच्च न्यायालयाकडुन गुन्हा रद्द झाल्याची चुकीची माहीती प्रसारमाध्यमांना देत असुन याविरुद्ध तातडीने अवमानना याचिका दाखल करणार असल्याचे फड यांनी सांगीतले आहे.
अंतरीम स्थगिती म्हणजे गुन्हा रद्द नसतो व जामिन म्हणजे निर्दोष मुक्तता नसते एवढं ज्ञान धनंजय मुंडेंना नाही काय? असाही प्रश्न फड यांनी ऊपस्थित केला आहे.

निव्वळ तांत्रिक कारणांनी उच्च न्यायालयाच्या आदेशांवर अंतरीम म्हणजेच तात्पुरती स्थगिती दिलेली असली तरी गुन्हा सकाळीच दाखल झाल्याने धनंजय मुंडेंना पोलिस कारवाईपासून अद्याप दिलासा मिळालेला नाहिये.यामुळे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी स्वत:ची पाठ थोपटु नये.
त्यांच्यावरील गुन्हा आज सकाळीच दाखल झाला आहे व आम्ही त्यांना सजा मिळाल्याशिवाय शांत बसनार नाही असा दावा देखील तक्रारकर्ते राजाभाऊ फड यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *