विद्यार्थी हित जोपासण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे―पी.टी.पाटील

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―विद्यार्थी व शाळेचे हित जोपासण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे पहूरपेठ ता.जामनेर येथील जि.प.शाळा संतोषीमातानगर शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी १४/६/२०१९ रोजी शालेय व्यवस्थापन समितीच्या मिटींग मध्ये केले.त्यांनी उपस्थित सदस्यांसमोर बोलतांना सांगितले की ,या वर्षापासून इयत्ता १ली चा सेमी वर्ग सुरू होत आहे तसेच शाळा ही आयएसओ मानाकंन प्राप्त आहे.मोफत पाठ्यपुस्तके ,शालेय गणवेश, गुणवत्तापुर्ण शिक्षण,दर्जेदार शालेय पोषण आहार इत्यादी बाबतीत अधिक प्रमाणावर भर दिला जातो त्यासाठी पालकांनी संतोषीमातानगरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच प्रवेश घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी पालकांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा श्रीमती निर्गुणा महाजन ह्या होत्या.उपस्थितांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. सदर मिटिंग मध्ये आर्थीक व्यवहारात झालेल्या जमा -खर्चास मान्यता देणे ,शालेयपुर्व तयारी बाबत ,शालेय गणवेश ,मोफत पाठ्यपुस्तके ,शालेय पोषण आहार ,शैक्षणिक वाढीसाठी प्रयत्न करणे , वृक्षलागवड बाबत ,विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे बाबत इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमास श्रीमती निर्गुणा महाजन ,प्रवीण लहासे ,राजेंद्र धुळसंधीर ,फिरोज तडवी सौ.
स्वाती आस्कर ,बन्सी तायडे,श्रीमती चित्रलेखा राजपुत तसेच शिक्षक श्रीमती रत्नमाला काथार,श्रीमती रोहिणी शिंदे ,श्रीमती मनिषा राऊत आदि उपस्थित होते.प्रास्ताविक श्रीमती रत्नमाला काथार यांनी केले व आभार रोहिणी शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *