हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ७ जणांचा मृत्यू ;गुजरातमधील घटना

अहमदाबाद दि.१५ :आठवडा विशेष टीम―
गुजरातमधील वडोदरा येथे एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. वडोदरा येथील फर्टीकुई गावातील ही घटना आहे. मृतांमध्ये हॉटेलच्या ४ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, अजय वसावा (२४ वर्ष), विजय चौहान (२२ वर्ष), सहदेव वसावा (२२ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. अन्य ४ जणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पण अद्याप हॉटेल मालकाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत असल्याचे समजते आहे.

दर्शन हॉटेलमध्ये महेश पतनवडिया, अशोक हरिजन, बृजेश हरिजन आणि महेश हरिजन सेप्टिक टँकची सफाई करण्याकरिता गेले होते. हॉटेलमधील कर्मचारी विजय चौधरी, सहदेव वसावा आणि अजय वसावा हेही त्यांची मदतीसाठी तेथे उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.