सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुकाभर पावसाने धो-धो बरसल्याने झालेल्या मुसळधार पावसात सोयगाव शिवारात शेतात पाणीच पाणी साचल्याने बनोटी-सोयगाव रस्त्यावर झाडे आडवे पडली आहे.दरम्यान सोयगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून बनोटी मंडळ अतिवृष्टीच्या जवळ जवळ ठेपले आहे.बनोटी मंडळात गोंदेगाव भागात शेती शिवारात पाणीच पाणी साचल्याने शेतींचे नाले तयार झाले आहे.
सोयगावसह तालुकाभर शनिवारी रात्रभर पावसाने झोडपल्याने सोयगाव तालुक्यात एका मंडळात अतिवृष्टी झाली असून बनोटी मंडळात ६० मी.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान आलेल्या पावसात बहुलखेडा ता.सोयगाव येथील बंधारा ओव्हरफ्लो झाला असून घोसला गावाजवळील नळकांडी पूल नाल्याच्या पहिल्याच पुरात वाहून गेला असल्याने घोसला गावाजवळ बनोटी-सोयगाव रस्ता खचला असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती,दरम्यान सोयगाव ते बहुलखेडा त रस्त्यादरम्यान झाडे कोसळल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता.पावसाने तालुकाभर दाणादाण उडवून दिल्याने सोयगाव तालुक्यात खरीप पिकांचे नुकसान झाले असून बनोटी भागात मात्र शेतीचे बंध फुटून पाणी शेतात साचले आहे.
दरम्यान सोयगाव-बनोटी रस्त्याचे लागत असलेल्या नाल्यांमधून सार्वजनिक विभागाने रस्त्याच्या दुतर्फा पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था न केल्याने रस्त्यालागतचे पाणी रस्त्यावर आले आहे.