सोयगाव: वटपोर्णिमा निमित्त सोयगाव पोलिसांची महिलांना जनजागृती

सोयगाव दि.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―महिलांचा सन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वटपोर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी(ता.१६)सोयगाव पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी सोयगाव पोलिसांनी शनिवारी रात्रीपासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून महिलांना जनजागृती करून सतर्कतेचा इशारा दिला आहे.यामध्ये महिलांनी घरापासून लांब अंतरावर असलेल्या जंगलातील वडाच्या झाडाच्या पूजेसाठी जातांना अंगावर सोन्याचे दागिने घालून जातांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून सोहल मिडीयाच्या क्रेझच्या माध्यमातून जनजागृती हाती घेतली आहे.
दुष्काळाची दाहकता आणि खराब झालेली परिस्थिती यामुळे होणारा अनर्थ टाळण्यासाठी महिलांनी जंगल भागात वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी जातांना सतर्क राहून रस्त्यात अनोळखी व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले असून यासाठी सोयगाव पोलीस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेख शकील ,माधव गुंडीले,यांनी दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.